Vasco: अबकारी खात्याच्या धाडीत 57 हजारांची देशी, विदेशी बनावटी दारू जप्त

वास्कोत अबकारी खात्याने विविध ठिकाणी घातलेल्या धाडीत एकूण 57 हजार रुपयांची अवैद्यरित्या विक्रीस उपलब्ध ठेवण्यात आलेली देशी, विदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
Vasco: अबकारी खात्याच्या धाडीत 57 हजारांची देशी, विदेशी बनावटी दारू जप्त
Excise department seizes 57000 worth of domestic and foreign counterfeit liquorDainik Gomantak

Vasco: वास्कोत अबकारी खात्याने विविध ठिकाणी घातलेल्या धाडीत एकूण 57 हजार रुपयांची अवैद्यरित्या विक्रीस उपलब्ध ठेवण्यात आलेली देशी, विदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Elections) बिगुल वाजले असून, निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील निवडणूक यंत्रणा अधिक सक्रीय झाली.

Excise department seizes 57000 worth of domestic and foreign counterfeit liquor
Goa University:..त्यामुळे गोवा विद्यापीठाने परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या

तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात तपासणी, भरारी तसेच दक्षता पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच अबकारी खात्याचे (Excise Department) पथक प्रत्येक तालुक्यात सक्रीय झाले आहे. निवडणूक प्रचारावेळी (Election Campaign) पैशांची, दारूचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने अबकारी खात्यानेही बार अँड रेस्टॉरंट्स, दारूविक्री दुकानावर (liquor shops) वेळेचे निर्बंध घातलेले आहेत. त्यानुसार याचेही बार मालकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वास्कोच्या अबकारी खात्याचे निरीक्षक राजेश सालेलकर व मुकुंद गावस यांनी वास्कोत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ७५ हजार रुपयांची देशी विदेशी बनावटीची अवैधरित्या विक्रीस उपलब्ध करण्यात आलेली दारू जप्त केली. दारू दुकानावर अधिक स्टॉक उपलब्ध करून ठेवण्यात आलेली दारू कारवाई दरम्यान जप्त करण्यात आली. वास्को अबकारी खात्याचे निरीक्षक मुकुंद गावस, राजेश सालेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को अबकारी विभागाचे विठोबा मालवणकर, दत्ता कवठणकर, रितेश तोरस्कर, शब्बीर शेख, देविदास तिरोडकर यांनी सदर कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com