गोव्यात नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

गोव्यात नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. सरकारी कार्यालयात आज मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.

पणजी: गोव्यात नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. सरकारी कार्यालयात आज मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. बाजारात मात्र खरेदीसाठी मोठी गर्दी होती‌. गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने गेले तीन दिवस येत आहेत. नाताळ पासून सुरू झालेले उत्साही वातावरण नव्या वर्षाच्या सुरवातीपर्यंत कायम राहणार आहे.

कोविड काळात पर्यटन क्षेत्राचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारने प्रसिद्ध केला आहे. आता पर्यटन क्षेत्र पुन्हा नाताळनिमित्त उभारी घेत आहे. सध्या पर्यटक मोठ्या संख्येने वाहने घेऊन आल्याने वाहतूक कोंडी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

आणखी वाचा:

ब्रिटनमधून आलेल्या 602 प्रवाशांची गोव्यात शोधमोहिम -

संबंधित बातम्या