गोव्यात ‘रोझरी’चे फेस्त उत्साहात

या फेस्ताचे मुख्य मास पोर्ट ब्लेअरचे बिशप एमिरेट्स आलेक्स दा नेविस डायस यांनी सादर केले.
गोव्यात ‘रोझरी’चे फेस्त उत्साहात
Excitement of Rosary fest in Goa dainik gomantak

मडगाव: नावेली येथील अवर लेडी ऑफ रोझरी सायबिणीचे फेस्त काल उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्त मोठ्या प्रमाणावर नावेली चर्चमध्ये जमले होते. या फेस्ताचे मुख्य मास पोर्ट ब्लेअरचे बिशप एमिरेट्स आलेक्स दा नेविस डायस यांनी सादर केले.

Excitement of Rosary fest in Goa
सॅन 11 मारेन येथे शेकडो भाविकांनी रोझरी सायबिनला भेट दिली;पाहा व्हिडिओ

काल या फेस्तानिमित्त सकाळी 5 वाजल्यापासून प्रार्थना सुरू झाल्या होत्या. सकाळी 10 वाजता मुख्य मास झाल्यानंतर रोझरी सायबिणीची मूर्ती घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नावेलीचे चर्च जुन्या चर्चपैकी एक असून 1954 साली ते बांधून रोझरी सायबिणीला समर्पित केले होते. त्या वर्षांपासून हे फेस्त चालू असून प्रत्येक वर्षी ते भक्तिभावाने साजरे करण्यात येते. काल फेस्तानिमित्त फेरीही भरली होती. भाविकांनी या फेरीत फिरून खरेदीही केली. मागचे 9 दिवस या फेस्ता निमित्त रोज संध्याकाळी प्रार्थना आयोजित करण्यात आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com