डिचोलीत वाळवंटी नदीतिरी रंगला नौकाविहार

शांतादुर्गा देवस्थानची त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात
डिचोलीत वाळवंटी नदीतिरी रंगला नौकाविहार
डिचोलीत वाळवंटी नदीतिरी रंगला नौकाविहारDainik Gomantak

डिचोली: पालखी, दीपदान, नौकानयन आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मध्यरात्री प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली नौकानयन स्पर्धाही यंदा रंगली.

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त ग्रामस्थ गावकर मंडळाकडून सकाळी श्री शांतादुर्गा मंदिरात पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. रात्री श्रींची पालखी वाजतगाजत वाळवंटी नदीकाठी नेण्यात आल्यानंतर त्याठिकाणी पूजा आदी पारंपरिक विधी पार पाडण्यात आले. उपस्थित भाविकांना चिरमुऱ्याही वाटण्यात आल्या.

दीपदान आणि नौकानयन

मध्यरात्री दीपदानाचा कार्यक्रम झाला. भाविकांनी पेटत्या पणत्या नदीच्या पाण्यात सोडल्या. पाण्यात पेटत्या पणत्या तरंगतानाचे दृष्य मनोहारी होते. नंतर नौकानयन स्पर्धेला सुरवात झाली. मोजक्याच परंतु आकर्षक आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नौका (बोटी) स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धेची रंगत वाढली. शेकडो नागरिकांनी नदीच्या पाण्यात नौकानयनाचे नेत्रसुख घेतले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com