विद्यार्थ्यांसाठीची पोस्टर स्पर्धा उत्साहात; मांगोरहिलतर्फे आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

सर्वसाधारणपणे जग आणि विशेषतः गोव्यामध्ये वैद्यकीय बंधुत्व, पोलिस विभाग, नगरपालिका कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, औषधनिर्माण उद्योग इत्यादी सर्व आघाडीच्या लढवय्यांबरोबर एकात्म भावना व्यक्त करणे हाही त्यामागील उद्देश होता.

पणजी: शासकीय विद्यालय, मांगोरहिलतर्फे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे, त्यांना शिक्षित करणे आणि संवेदनशील बनविणे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी ‘कोरोना विषाणू आणि सुरक्षितता’ या विषयावर जागृती मोहिमेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने ‘पोस्टर स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

 

सर्वसाधारणपणे जग आणि विशेषतः गोव्यामध्ये वैद्यकीय बंधुत्व, पोलिस विभाग, नगरपालिका कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, औषधनिर्माण उद्योग इत्यादी सर्व आघाडीच्या लढवय्यांबरोबर एकात्म भावना व्यक्त करणे हाही त्यामागील उद्देश होता.

 

शाळेचे कला शिक्षक नागेश आर. सरदेसाई यांनी या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यास पुढाकार घेतला आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पी. नाईक यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले.

 

प्रथम मोठ्या दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, कुजिरा - गोवा येथील कला शिक्षक प्रवीण नाईक यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. कला शिक्षक, नागेश आर. सरदेसाई यांनी प्रास्ताविकात सांगितले, की कोरोनाचा मांगोरहिल भागात सर्वात जास्त परिणाम झाला होता. त्यामुळे त्या भागातील मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्यात जागृती वाढवण्यासाठी ही आंतरवर्ग स्पर्धा घेणे आवश्यक होते. स्पर्धा आयोजित करणारे चिंबल येथील शासकीय हायस्कूलचे मुख्याध्यापक विशाल सिग्नापूरकर यांनी आणि चित्र शिक्षकांना आव्हान स्वीकारण्याची विनंती केली आणि ही स्पर्धा घेण्यास मला माझ्या मुख्याध्यापिकेने प्रोत्साहित केले आणि संपूर्ण पाठिंबा दिला.

 

या साथीच्या रोगाचा प्रतिकार फक्त आवश्यक दक्षतेमुळे केला जाऊ शकतो आणि तरुणांची मते ही महत्वाची ज्याद्वारे जागरूकता पसरविली जाऊ शकते. इतके मोठे आव्हान स्वीकारण्याबद्दल विचारशील राहिल्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांचे आणि कला शिक्षक यांच्या प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करते असे नमूद करून मुख्याध्यापिका नीता नाईक म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली पाहिजे.

 

यल्लमा मद्दीमणी व ममता तलवार प्रथम

लहान गटात यल्लमा मद्दीमणी, सरस्वती डी. मेती आणि दीपा मदार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला व मोठ्या गटात ममता तलवार, प्रगती आणि रविकुमार बिंद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. संयोजक चिंबेल येथील शासकीय हायस्कूलचे मुख्याध्यापक विशाल सिग्नापूरकर यांनी शिक्षकाना आवाहन करून आणि पाठिंबा दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या