'फास्टॅगच्या सक्तीतून गोवा राज्याला वगळा'; गिरीश चोडणकरांची मागणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

अधिसूचनेतून गोवा राज्याला वगळण्यात यावे अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

पणजी: वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना काढून सर्व वाहनांना फास्टटॅग सक्ती केली आहे मात्र गोव्यात एकही टोल नाका नसताना गोव्यातील वाहनांसाठी ही सक्ती चुकीची आहे त्यामुळे अधिसूचनेतून गोवा राज्याला वगळण्यात यावे अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. जर भाजप सरकारने या अधिसूचनेतून  गोवा राज्याला वगळण्यासाठी प्रयत्न न केल्यास किंवा ही अधिसूचना गोव्यासाठी मागे न घेतल्यास त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे दरवाजे ठोठावले जातील असा इशारा चोडणकर यांनी यावेळी दिला.

मगोचे आमदार सुदिन ढवळीकर वकिलांसह विधानसभा संकुलात दाखल

गोव्यात एकही टोल नाका नसताना वाहतूक मंत्रालयाने फास्टटॅग सक्ती का केली आहे असा सवाल उपस्थित करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश तोडांकर म्हणाले की केंद्र सरकारने लोकांना लुटण्याचे षडयंत्र रचले आहे व गोवा सरकार त्यासाठी केंद्राला मदत करतोय असा आरोप त्यांनी केला. देशात आधीच पेट्रोल व डिझेलचे दर वाढले असताना गोव्यातील लोकांवर हा नाहक भुर्दंड लादला गेला आहे व हा अत्याचार आहे असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या