गोवा डेअरीच्या कार्यकारी संचालकाविरोधात तक्रार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोवा डेअरीचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी आपल्याला अश्‍लिल शिवीगाळ करुन गंभीर स्वरुपाची धमकी दिली आहे. अशी लेखी तक्रार साळ येथील भूमिका सहकारी दूध उत्पादक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आदिनाथ परब यांनी डिचोली पोलिसात दिली आहे.

डिचोली:  गोवा डेअरीचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी आपल्याला अश्‍लिल शिवीगाळ करुन गंभीर स्वरुपाची धमकी दिली आहे. अशी लेखी तक्रार साळ येथील भूमिका सहकारी दूध उत्पादक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आदिनाथ परब यांनी डिचोली पोलिसात दिली आहे.

कार्यकारी संचालकांपासून आपल्या जिविताला धोका असल्याची भीतीही श्री. परब यांनी व्यक्‍त केली असून, य्राकरणी आवश्‍यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी श्री. परब यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.   गुरांना लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी आपण मागील सोमवारी (ता.२६) रोजी  दुपारी कुर्टी-फोंडा येथील गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयात (गोवा डेअरी) गेलो होतो.

त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी आपण डेअरीत येण्यामागचे कारण विचारले आणि आपल्या केबिनमध्ये येवू नकोस, आल्यास तुला तोपणार. अशी धमकी दिली. आपण त्याकडे दुर्लक्ष करुन माघारी आलो. असे आदिनाथ परब यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अनिल फडते यांनी आपल्याला कॉल करुन शिव्या घालायला सुरवात केली. नंतर आपण कॉल बंद केला. नंतर लगेचच त्यांनी आपल्याला दोनवेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, एकदा आपण कॉल स्वीकारुन त्याला जाब विचारला आणि कॉल बंद केला आणि पुन्हा त्यानी कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, आपण ते स्वीकारले नाहीत. असे आदिनाथ परब यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

संबंधित बातम्या

Tags