दस्तावेजांचे योग्य संवर्धन करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डिजिटलायजेशन गरजेचे : पुरातत्त्व व पुराभिलेख संचालनालयातर्फे प्रदर्शन
दस्तावेजांचे योग्य संवर्धन करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Goa CM Pramod Sawant NewsDainik Gomantak

पणजी: गोव्याचे काही दस्ताऐवज जे पोर्तुगालमध्ये आहेत, काही महाराष्ट्रात आहेत ते गोव्यात आणणे गरजेचे आहे त्याचसोबत असलेल्या दस्ताऐवजांचे योग्य प्रकारे संवर्धन करत त्यांचे डिजिटलायजेशन होणे गरजेचे आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.

(Exhibition by the Directorate of Archeology and Archeology in Goa)

Goa CM Pramod Sawant News
प्रशासकांच्या हाती पंचायती सहा महिन्यांसाठीच : गुदिन्हो

पुरातत्त्व व पुरातनशास्त्र संचालनालयाच्यावतीने गोवा क्रांतिदिनाचे औचित्य साधून पुराभिलेख प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुरत्तत्व व पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई, संचालिक ब्लॉसम मेडिरा व बालाजी शेणवी उपस्थित होते.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, जर दस्ताऐवजांचे डिजिटलायजेशन झाले नाही तर भविष्यात हे काम अधिक कठीण होईल. डिजिटलायजेशनचा पुढच्या पिढीला निश्‍चितच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

सुभाष फळदेसाई म्हणाले, आज आम्ही स्वतंत्र नागरिक म्हणून मोकळा श्‍वास घेत आहोत आणि विकासाच्या अनुषंगाने पावले उचलत आहोत. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोमंतकीय जनतेच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली आणि ही क्रांती वाढतच गेली. आम्हाला इतरांचा इतिहास माहित असतो; मात्र स्वतःचाच इतिहास माहीत नसतो. त्यामुळे शालेय पुस्तकात देखील आमचा इतिहास समाविष्ट व्हावा, असे त्यांनी सांगितले.

Goa CM Pramod Sawant News
माविन यांचा जमिनीवर दरोडा; काँग्रेसचा आरोप

बालाजी शेणवी म्हणाले, पोर्तुगीजांनी लष्करी लावादाची स्थापन पोर्तुगीज सैनिकांचे खटले सोडविण्यासाठी त्यांच्या शिस्तीवर कारवाई करण्यासाठी केली होती. मात्र, याचा वापर स्वातंत्र्यसैनिकांवर कारवाई करण्यासाठी करण्यात आला.

सोमवारपर्यंत प्रदर्शन खुले

या कार्यक्रमा दरम्यान लष्करी लवादाच्या प्रदर्शनावर आधारित पुस्तिकेचे तसेच ट्रायल ऑफ सुधा महादेव जोशी ॲण्ड अदर्स या संपादित पुस्तकाचे तसेच डॉ. टी. बी. कुन्हा लिखित डिनॅशनलायजेशन ऑफ गोवा या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाचे प्रकाशन मुख्यमंत्र्याचे हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन 20 जून पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com