वास्कोत भारतीय राजस्थान ग्रामीण मेळ्याचे प्रदर्शन

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

हातकामाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणाऱ्या भारतीय राजस्थान ग्रामीण मेळ्याचे प्रदर्शन वास्को येथील टूरीस्ट हॉलमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. 

दाबोळी: हातकामाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणाऱ्या भारतीय राजस्थान ग्रामीण मेळ्याचे प्रदर्शन वास्को येथील टूरीस्ट हॉलमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. 

 गेली कित्येक वर्षे गोव्यात राजस्थान मेलाचे आयोजन पणजी, मडगाव, वास्को येथे करण्यात येत असून यंदाही कोरोना महामारीवर मात करत वास्को टूरिस्ट रेसिडेन्सीमध्ये या राजस्थानी मेलाचे प्रदर्शन करून देशातील विविध राज्यातील कलाकारांच्या कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू, कपडे या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. यात बनारसी सिल्क साडी, लखनऊ चिकन वर्क, कार्पेट, कायावर्क, का य कॉटन साडी, चुडीदार, कटवर्क, टेक्स्टाईल, जयपुर बेंगल्स कश्मीरी फर्निचर व इतर ड्रेस मटेरियल उपलब्ध ठेवण्यात आले आहे.

प्रदर्शन २१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत चालणार असून लोकांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ उठवावा असे आयोजक महावीर जैन यांनी आवाहन केले आहे. उद्घाटक या नात्याने दीपक नाईक बोलताना भारतात बनवलेल्या या विविध वस्तूंची लोकांनी खरेदी करून कलाकारांच्या कलाकृती सन्मान द्यावा. आत्मनिर्भर भारतजी हाक नरेंद्र मोदीने पुकारलेला आहे, ती आपल्याच देशातील कलाकारांच्या कलाकृतीने घडत आहे. अशा कलाकारांना प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर भारताला चालना द्यावी असे आवाहन दीपक नाईक यांनी केले. 

आणखी वाचा:

 

संबंधित बातम्या