
म्हापसा: कचरा व्यवस्थापनविषयक गोव्यातील पहिलेवहिले ‘स्टार्ट-अप’ आस्थापन असलेल्या ‘यिंबी’चा आजपासून कार्यविस्तार होणार आहे. कार्यक्रमात आस्थापनाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करून ई-कॉमर्स संकेतस्थळाचाही शुभारंभ केला जाईल. संकेतस्थळावर विविध पर्यावरणप्रिय उत्पादनांची माहिती प्रसिद्ध करून त्यापासून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जाईल.
कचरा व्यवस्थापन आणि संशोधनपर कार्यपद्धतीचा अर्थांत ‘इनोवेटिव वेस्ट एड ॲण्ड मॅनेजमेंट’चा अवलंब करणाऱ्या म्हापसा येथील ‘यिंबी’ (व्हायआयएमबीआय)च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता खोर्ली-म्हापसा येथे होणार आहे. काणका बगलमार्गावर असलेल्या जेएमबी कॅपिटल बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचे उद्घाटन पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आमदार ज्योशुआ डिसोझा व नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांची उपस्थिती असेल, अशी माहिती या आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पोकळे यांनी दिली.
पोकळे म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमामुळे ‘यिंबी’ची स्थापना झाली आहे. कोविड महामारीच्या कठीण काळात या आस्थापनाची स्थापना झाली असतानाही हे आस्थापन नफ्यात असून, त्यामुळे ‘एचएनआय’ अर्थांत ‘हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स’ व कॉर्पोरेट कंपन्यांनीही त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. ‘यिंबी’ हा गोमंतकीय स्टार्ट-अप उपक्रम असून, कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्याद्वारे किमान वीस गोमंतकीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस या आस्थापनाचा अधिकाधिक कार्यविस्तार होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.