भाजप सरकारकडून कोविडच्या नावाखाली गोमंतकीयांचे शोषण : संजय बर्डे

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

भाजप सरकारकडून कोविडच्या नावाखाली गोमंतकीयांचे शोषण होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज शनिवारी केला.

म्हापसा: भाजप सरकारकडून कोविडच्या नावाखाली गोमंतकीयांचे शोषण होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज शनिवारी केला.

ते पुढे म्हणाले, की एवढे महिने उलटले तरी सरकार कोविडवर नियंत्रण राखू शकले नाही. त्यात भरीस भर म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शासकीय तिजोरीत आर्थिक भर पडावी या हेतूने सरकार विविध प्रकारच्या क्लुप्त्या लढवून सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरीत आहे. आरोग्यविषयक सेवा पुरवण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे खासगी इस्पितळांत कोविडविषयक उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दुसरे म्हणजे त्या खासगी इस्पितळात देखील पुरेशा खाटा नसल्याने काही जणांना स्ट्रेचरवरही झोपवले जात आहे, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालता येत नाही.

गरीब जनतेला कोविडविषयक उपचारासंदर्भातील शुल्क परवडत नाही. अशा स्थितीत केंद्र सरकारचा निधी नेमका गेला कुठे, असा सवाल निर्माण होत आहे, असेही श्री. बर्डे यांनी नमूद केले. जेमतेम पंधरा लाख लोखसंख्या असलेल्या गोव्यातील लोकांची काळजी घेण्यास सरकार अपयशी ठरल्याबद्दल सर्वप्रथम आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांचे सर्व सहकारीही तेवढेच दोषी आहेत, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला बलभीम मालवणकर व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या