Father's Day: गोमन्तक सोबत करूया सेल्फी क्लिक आणि बाबांबद्दल व्यक्त होवूया

fathers day.jpg
fathers day.jpg

ठेच लागली तर ओठांवर आई च नाव येत, घरी जातांना वाटेत पावसाने झोडपल आणि त्यात विजांचा कडकडाट झाला तर
बापरे किती जोराचा पाऊस झाला असावं उद्गार ओठांवर येतात
म्हणजे म्हणायचं काय तर सर्वसाधारण वेळी आपल्याला आई आठवते आणि मोठ्या संकटाच्या वेळी आई. 
 अस म्हणतात की मुली वडिलांच्या आणि मुलं आईच्या जवळचे असतात. पण मला अस वाटत नाही शेवटी आपल्या अपत्यांची आर्थिक जबाबदारी तर वडीलच उचलतात ना.... 
वरून कडक दिसणारे बाब आतून फणसाच्या गऱ्यासारखे मऊ असतात. आणि तस त्याना वागावं लागत कारण आपला बाप कणखर असतो. त्याला चांगल्या प्रसंगात दिलखुलास हसता येत पण कठीण आणि संकट समयी रडता येत नाही, कारण तो आपले इतरांचे अश्रू पुसायला असतो घरातल्याना आधार देणारा आधारवड असतो... (Express ourselves about Father on Dainik gomantak )
आणि म्हणून आम्ही गोमंतक तर्फे घेऊन आलोय आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही आपल्या आवडीची, थोडी इमोशनल तर थोडी प्रोफेशनल अशी एक संधी...
आईच्या महानतेचे गोडवे गाताना "बाप" कुठेतरी हरवला जातो. पण आई इतकाच "बाप" पण मुलांवर प्रेम करतो आई घास भरवते तर बाप तो घास घरापर्यंत आणण्याच्या प्रयत्नात सगळे आयुष्य खर्ची घालत असतो. म्हणूनच आपल्याला कृष्णावर माया करणारी यशोदा आठवत असेल तर कृष्णाला भर पावसात जीवाची पर्वा न करता टोपली मध्ये नदीतून गोकुळात आणणारा बाप वसुदेव पण आठवला पाहिजे.
आणि म्हणुनच आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या 20 तारखेला आपण गोमंतक सोबत फादर्स दे सेलिब्रेट करणार आहोत.
आई इतकेच ममत्व जपणाऱ्या सर्व बाबांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देऊया.. आणि या फादर्स डे ला काही तरी वेगळं करून आपल्या बाबांबद्दल व्यक्त होऊया. बाबांना आपल्या मनातील भावना सांगूया.

त्यासाठी, फादर्स डे विथ गोमन्तक 2021 या कन्सेप्ट मध्ये आपल्या सहभागी व्हावं लागेल.
 असे जुळा गोमंतक शी

1 पाठवा आपल्या बाबांसोबतचा एक फोटो 
आणि मिळवा संधी आमच्या सोशल मीडियावर झळकण्याची 

*फोटो कसा पाठवावा?
1बाबांसोबत फोटो काढा आणि 
तुमच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अपलोड करा 
 
2 तुमच्या बाबांची सर्वात आवडती गोष्ट 
फोटो सोबत कॅप्शनमध्ये लिहा 

3 @dainikgomantak ला टॅग करा 
हॅशटॅग #GomantakContest वापरा 

4 आम्हाला फोटो सोशल मीडियावर 
मेसेज करूनही तुम्ही पाठवू शकता 

5 स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख 18 जून 2021

चला तर येत्या फादर्स दे ला बाबांनी आठवूया त्यांच्या कोणत्या कृती ने तुम्ही प्रेरित झालात त्या आठवणींना उजाळा देऊ या.. वरील टिप्स फॉलो करा आणि मिळवा संधी दैनिक गोमंतक च्या सोशल मीडियावर झलकण्याची.....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com