दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे नेत्रदानाचा उपक्रम

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघाने नेत्रदानाचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. १३ रोजी दामोदरनगर येथील सक्षम कार्यालयात नेत्रदान शिबिराचे आयोजन केले आले.

फातोर्डा: अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघाने नेत्रदानाचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. १३ रोजी दामोदरनगर येथील सक्षम कार्यालयात नेत्रदान शिबिराचे आयोजन केले आले. सक्षम संस्थेचे अध्यक्ष अभय प्रभू,  सचिव संतोष कुमार आणि समिती सदस्य तसेच अखिल गोमंतकिय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 

अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघाच्यावतीने अध्यक्ष रोहित वेर्णेकर यांनी यावेळी नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतलेल्या ४३ नेत्रदात्यांचे अर्ज सक्षमचे अध्यक्ष अभय प्रभू यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी सक्षम संस्थेच्‍या अध्यक्षांनी नेत्रदानाचे महत्त्‍व सांगितले व या नेत्रदानाने आपण भारतातील कार्निया अंधत्वाने ग्रासलेल्या लोकांना दृष्टी देऊ शकतो, असे सांगितले. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघाच्यावतीने असे नेत्रदान शिबिरे गोव्यात अनेक ठिकाणी नियमितपणे घेणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

संबंधित बातम्या