Devendra Fadnavis: हरीश रावत म्हणाले 'कोई बम तो नही फुटा', फडणवीस भडकले
Devendra FadnavisDainik Gomantak

Devendra Fadnavis: हरीश रावत म्हणाले 'कोई बम तो नही फुटा', फडणवीस भडकले

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावेळी झालेल्या प्रकारात विविध कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर देवेंद्र फडणवीसांनी परखड टीका केली आहे.

Devendra Fadnavis: मागील काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचा ताफा पंजाबमधील शेतकऱ्यांनी अचानक रस्त्यावर येऊन अडवला. यावरुनच सुरक्षेच्या कारणावरुन पंजाबमधील फिरोजपूरचा दौरा पंतप्रधान मोदींना रद्द करावा लागला. या विषयावर खूप मोठे वादंग निर्माण झाले. या विषयासाठी आणि येत्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोवा दौऱ्यावर होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंजाब सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

Devendra Fadnavis
संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखते?

फडणवीस म्हणाले की, 'जेव्हा पंतप्रधान (PM Narendra Modi) कोणत्याही राज्याला भेट देतात त्यावेळी तीचे संपूर्णपणे प्लॅनिंग ठरलेले असते. सरकारी प्रोटोकॉलप्रमाणेच पंतप्रधानांचा संपूर्ण कार्यक्रम आयोजित असतो. पंजाब दौऱ्यावेळीदेखील संपूर्ण आराखडा तयार होता. वेळोवेळी सूचना संबंधितांना देण्यात येत होता तरीही मोदींना तब्बल 20 मिनिटे पुलावर थांबावे लागले आणि तेथील शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आणि मोदींना दौरा सोडून जावे लागले. हा सर्व प्रकार अचानकपणे नाही तर ठरवून करण्यात आला आहे. तिथल्या स्थानिक पोलिसांना ह्या सर्व प्रकाराची आधीच माहिती होती, आणि त्यांनी याबद्दल आपल्या वरिष्ठांना सांगितले होते. पण 4 दिवस अगोदर अलर्ट देऊनही पंजाब सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. कारण त्यांना सरकारचे स्पष्ट आदेश होते की या प्रदर्शन काऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, त्यामुळे आम्ही यावर काहीच केले नाही.'

एवढेच नव्हे, एका खाली खलिस्तान गटाने जाहीर केले होते की, 'मोदींना कुणी चप्पल भिरकावून मारले तर त्याला आम्ही 1 लाख डॉलर देऊ', ही माहितीही स्थानिक पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता, त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पंजाब सरकारला ज्यावेळी याबद्दल विचारले असता, ' मोदींचा दौरा अचानकपणे हवाई मार्गाऐवजी रास्ता मार्गाने ठरल्याने आम्ही याबद्दल काहीच करू शकलो नाही', या उत्तरावर फडणवीसांनी पंजाब सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, 'हवामान खराब असल्यामुळे मोदींचा दौरा रास्ता मार्गाने होणार ही आधीच पंजाब सरकारला कळविण्यात आले होते, तरीही जाणीवपूर्वक त्यांच्या सुरक्षिततेमध्ये कुचराई करण्यात आली. शिवाय पंतप्रधानांचा दौरा ज्याठिकाणी असतो तिथले संपूर्ण मार्केट बंद करायचे असते, पण मोदी पंजाब मध्ये जय पुलावर थांबले होते तिथले मार्केट सोडा, दारूची दुकानेही सरकारने जाणीवपूर्वक सुरूच ठेवली होती. म्हणजे पंजाब सरकारने मोदींना अडवण्याचा पूर्ण प्लॅनच केला होता.'

Devendra Fadnavis
शरद पवारांनी यापूर्वीही हातात हात घेत आघाड्या केल्या होत्या...

ते पुढे म्हणाले, ' ज्या ठिकाणी मोदी थांबले होते तिथून पाकिस्तानची हद्द 10 कीमी अंतरावर होती. म्हणजे PM मोदी ही पाकिस्तान ताफ्याच्या रेंजमध्ये होते. शिवाय तिथे घरे आणि दाट झाडी होती ज्यामुळे तिथे हल्ला होण्याच्या शक्यता होती. आजवर अशाच ठिकाणी स्नायपर हल्ले झाले आहेत. म्हणजे मुद्दाम मोदींना अशाच ठिकाणी थांबावे लागणे ही नियोजित होते. त्यामुळे आम्हाला असे वाटते की ही सगळे ठरवून केले आहे. त्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे यावर आलेल्या प्रतिक्रिया या संतापजनक आहेत. कॉंग्रेस नेते सिद्धू म्हणाले की 'हा सगळा ड्रामा आहे', हरीश रावत म्हणाले, 'कोई बम तो नही फुटा', त्यामुळे लक्षात येत आहे या प्रकरणात संपूर्णपणे लक्षात येते की ही सगळे कॉंग्रेसने घडवून आणले आहे. त्यामुळे या सर्व लोकानी देशाच्या पंतप्रधानांचा आणि संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने पंजाब मुख्यमंत्र्यांचा यामागे हात आहे की नाही, याची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.