गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची दिल्लीवारी, शहांची घेतली भेट!

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोव्याचे निवडूणक प्रभारी म्हणून नवी जबाबदारी दिली आहे.
 Amit Shah & Devendra Fadnavis & Michael Lobo
Amit Shah & Devendra Fadnavis & Michael LoboTwitter/ ANI

येत्या सहा महिन्यांमध्ये देशातील पाच राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा राजकिय पक्ष असलेल्या भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरु केली असून केंद्रीय मंत्री, पक्षातील प्रमुख नेत्यांकडे विधासभा निवडणूकीसाठी राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोव्याचे (Goa) निवडूणक प्रभारी म्हणून नवी जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी (Union Minister G. Kishan Reddy) आणि राज्यमंत्री दर्शना जरदोश यांना सहप्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान गोवा विधानसभा निवडणूकीच्या (Goa Assembly Elections) पाश्वभूमीवर फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रमुख जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांची भेट घेतली आहे.

 Amit Shah & Devendra Fadnavis & Michael Lobo
Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

दरम्यान, फडणवीस यांनी सोशल मिडियावरील ट्वीटरवरुन माहिती देताना सांगितले की, ''भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात अनेक विषयांवर चर्चा आणि आवश्यक मार्गदर्शन घेतले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील पूरस्थितीच्या तपशीलाव माहिती सुध्दा देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गोवा सरकारमधील मंत्री आणि गोवा भाजपचे नेते मायकल लोबो (Michael Lobo) यावेळी उपस्थित होते.''

तसेच, ''आगामी गोवा विधानसभा निवडणूकीबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही यावेळी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन प्राप्त केले असल्याचेही यावेळी सांगण्यास फडणवीस विसरले नाही.'' त्याचबरोबर या ट्वीटसोबत फडणवीसांनी भेटीचे फोटो देखील शेअर करत आभार मानले.

 Amit Shah & Devendra Fadnavis & Michael Lobo
देवेंद्र फडणवीसांचे गोव्यात आगमन

शिवाय, येत्या गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा भाजप आपली सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होईल, असा विश्वास गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर बिहारनंतर गोव्याचे प्रभारीपद दिल्यामुळे मी पक्षाचे धन्यवाद मानतो, असही ते यावेळी म्हणाले. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आज आमच्यात नाहीत, परंतु गोव्यामधील जनता त्यांनी केलेल्या कामांना कधीच विसरणार नाही, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com