Fake Cashew in Goa : भेसळयुक्त काजू विक्रेत्यांवर ‘एफडीए’कडून धडक मोहीम

Fake Cashew in Goa : ‘गोमन्तक’च्या पर्दाफाशानंतर कळंगुट, कांदोळीत कारवाई
Fake Cashew in Goa
Fake Cashew in Goa Dainik Gomantak

पणजी : कमी दर्जा आणि भेसळयुक्त काजू विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कळंगुट व कांदोळी या किनारपट्टी भागात आज धडक कारवाई केली. अधिकाऱ्यांनी तेथील 8 आस्थापनांची तपासणी करत सीलबंद पाकिटामधील तसेच मोकळे असलेल्या काजूगरचे 5 विविध नमुने घेतले आहेत.

हे नमुने खात्याच्या बांबोळी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दै. ‘गोमन्तक’ने कमी दर्जाच्या काजूगर विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर एफडीए यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.

Fake Cashew in Goa
Goa Mid-Day Meal : दिवाळी सुट्टीनंतर माध्यान्ह आहार पुरवठा करणार बंद! स्वयंसेवी गटांचा इशारा

एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी सांगितले, की राज्यातील विविध भागात काजू विक्रेत्यांकडे असलेल्या काजूचे नमुने घेऊन ते तपासणीकडे प्रयोगशाळेत पाठवण्याची मोहीम पुढे सुरूच राहणार आहे.

कमी दर्जाच्या काजू संदर्भात खात्याकडे आलेल्या तक्रारीनुसार यावर्षी खात्यातर्फे फेब्रुवारी, ऑगस्ट व सप्टेंबर असे तीनवेळा अधिकाऱ्यांनी बार्देश, मुरगाव, तिसवाडी व सासष्टी तालुक्यातून काजूचे नमुने घेतले होते. सासष्टीत काही काजू व्यावसायिक खात्याचा परवाना न घेताच व्यवसाय करत होते. त्यापूर्वी 2021 मध्ये तिसवाडी, बार्देश व सासष्टी या तालुक्यांमधील काही काजू विक्रेत्यांच्या दुकानातून काजूगराचे सुमारे 22 नमुने घेतले होते.

या सर्व नमुन्यांची बांबोळी येथील खात्याच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता हे काजूगर कमी दर्जाचे आढळून आले होते. याप्रकरणी 8 जणांवर दंडात्मक कारवाई करत ६ लाख ५ हजार रुपये वसूल करण्यात आले. तर 13 प्रकरणांची सुनावणी अधिकाऱ्यांसमोर सुरू आहे.

अन्न व्यावसायिक ऑपरेटर्सना नोटीस

गेल्या काही महिन्यांत रंग दिलेले, कमी दर्जाचे सुमारे 23 हजार किमतीचे 16 किलो काजूगराची विल्हेवाट लावण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित आस्थापनाच्या मालकाविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. अन्न व्यावसायिक ऑपरेटर्सना त्यांच्या मालामध्ये सुधारणा करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यात सुधारणा न झाल्याचे तपासणीत आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा संचालिका ज्योती सरदेसाई यांनी इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com