बनावट दर्यावर्दी रोजगार रॅकेटचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश 

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

ओव्हर्ट मरिन या शिपिंग कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाईन पद्धतीने दर्यावर्दीच्या नोकरीसाठी प्रक्रिया करून नोकरीचे पत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दर्यावर्दी रोजगार रॅकेटचा क्राईम ब्रान्चच्या सायबर कक्षाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला.

ओव्हर्ट मरिन या शिपिंग कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाईन पद्धतीने दर्यावर्दीच्या नोकरीसाठी प्रक्रिया करून नोकरीचे पत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दर्यावर्दी रोजगार रॅकेटचा क्राईम ब्रान्चच्या सायबर कक्षाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. यासंदर्भातच्या अनेक तक्रारी डीजी शिपिंगकडून आल्या होत्या. या रॅकेटमधील गुवाहाटी येथील सुमित उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली आहे. 

ड्रग्ज माफियांवर जरब बसविण्यासाठी चांगला अधिकारी नेमण्याची गरज - विनोद पालेकर 

या बनावट संकेतस्थसंदर्भात तक्रार आल्यावर पोलिसांनी या संकेतस्थळाचा अकाऊंट बंद करत, त्याची सखोल चौकशी सुरू केली असता संशयित सुमित उपाध्याय याच्यापर्यंत पोहचण्यात यश आले. संशयिताने स्वतःची ओळख कोणालाही कळू नये म्हणून वेगवेगळे बनावट अकाऊंट, समिकार्ड तसेच तो गुवाहाटी, दिल्ली तसेच मुंबई अशा ठिकाणी जाऊन जागा बदलत होता. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री मिलिंद नाईकांच्या राजीनाम्याची मागणी

संशयित गुवाहाटी येथे असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या सायबर कक्षाच्या पोलिसानी गुवाहाटी पोलिसांशी संपर्क साधला. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता संशयित गुवाहाटी येथून मुंबईला जाण्यासाठी निघाला असता मुंबई व गुवाहाटी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित जाळ्यात अडकला. त्याला अटक करून गोव्यात आणले असून पुढील तपास सुरू आहे.

 

संबंधित बातम्या