बनावट जमीन व्यवहार प्रकरणी म्‍हापशातील तिघांविरोधात गुन्‍हा

माडेल येथील लवराज पेडणेकर यांनी माहितीहक्क कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीमुळे हा बनावट जमीन व्यवहार उघडकीस आला.
बनावट जमीन व्यवहार प्रकरणी म्‍हापशातील तिघांविरोधात गुन्‍हा
Crime Dainik Gomantak

म्हापसा : माडेल-थिवी येथील आठ हजार चौरस मीटर जागा ही बनावट स्टॅम्प व कागदपत्रांद्वारे परस्पर स्वतःच्या नावे केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान, अफसाना खान (म्हापसा) व आसिफ अल्लाबक्ष सौदागर (पेडे) या तिघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. निबंधक अर्जुन शेट्ये यांच्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. सदर प्रकार जुलै 2020 पूर्वी घडलेला आहे.

Crime
'सरकारी योजना घरोघरी पोहोचण्यासाठी प्रयत्न गरजेचे'

माडेल येथील लवराज पेडणेकर यांनी माहितीहक्क कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीमुळे हा बनावट जमीन व्यवहार उघडकीस आला. संशयित आसिफ सौदागर याच्याशी लवराज पेडणेकर यांची ओळख होती. रामा लवू पेडणेकर या लवराज पेडणेकर यांच्या वडिलांच्या नावे आपण जमीन खरेदी केली असल्याची माहिती संशयिताने पेडणेकर यांना दिली होती. त्यानुसार, पेडणेकर यांनी म्हापसा उपनिबंधक कार्यालयाकडून माहितीहक्क कायद्याखाली आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या विक्रीपत्राची माहिती मिळविली. थिवी पंचायत क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 455/7, 466/5 व 466/6 मधील सुमारे 8 हजार जमिनीचे विक्रीपत्र (सेल डीड) रामा लवू पेडणेकर यांच्या नावावर करण्यात आल्याचे आढळून आले. या जमिनीचे मूळ मालक ज्योकिम फोन्सेका, ॲनेश्‍‍थीन फोन्सेका व लुईस झेवियर मार्टिनो हे होते. 40.53 लाखांचे हे जमीन विक्री पत्र मार्च 2007 मध्ये केले होते.

Crime
मेरशीतील खारफुटीच्‍या 2 हजार झाडांची कत्तल; तृणमूल काँग्रेसचा आरोप

माहितीहक्क कायद्याने केली पोलखोल

सदर जमीन संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान, अफसाना खान व आसिफ सौदागर यांनी परस्पर आपल्या नावे केली. माहितीहक्क कायदा माहितीच्या आधारे सदर जमीन विक्रीप्रकरणी संशय व्यक्त करून तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेट्ये यांच्याकडे तक्रार दाखल करण्‍यात आली होती. उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या चौकशीत उपनिबंधकांचा बनावट स्टॅम्प व इतर बनावट कागदपत्रांद्वारे हा एकंदरीत जमीन विक्रीचा प्रकार घडल्याचे स्‍पष्‍ट आले. त्यानंतर शेट्ये यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरोधात भादंसंच्या 465, 466, 467, 471, 419, 420, 259 व 260 कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आशिष पोरोब हे करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com