आमदार विफ्रेड डिसांच्या नावे फेसबुकवर फेक पेज; मॅसेज पाठवून केली पैशांची मागणी

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

भाजपचे नुवेचे आमदार व दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एसजीपीडीए) अध्यक्ष विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांच्या नावाने फेसबुकवर बनावट पेज तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मडगाव ः भाजपचे नुवेचे आमदार व दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एसजीपीडीए) अध्यक्ष विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांच्या नावाने फेसबुकवर बनावट पेज तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसा यांनी या प्रकरणी गुन्हे शाखा व सायबर गुन्हे तपास विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. 

गोव्यात 9वी आणि 11वी ची परीक्षा ऑनलाइन मोडमध्ये; शिक्षण विभागाने जारी केले परिपत्रक 

या बनावट पेज बनवणाऱ्याने फेसबुक मॅेसेंजरवरून अनेकांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. एका पत्रकाराकडेही तातडीने 15 हजार हवे असल्याचे व संध्याकाळी 7 वाजता पैसे परत करणार असल्याचा संदेश पाठवला. डिसा यांना या प्रकराची माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित गुन्हे शाखा व सायबर गुन्हे तपास विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली. 

संबंधित बातम्या