प्रतिमा कुतिन्होंना उमेदवारी दिलेल्या काॅंग्रेस नेत्यांबद्दल फालेरोंची नाराजी 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

कुतिन्हो यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेशा केला. यावर फालेरो यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मडगाव: माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो हे काॅंग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना जिल्हा पंचायतीच्या नावेली पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत खूष नव्हते असे उघड झाले आहे. कुतिन्हो यांचे नाव मडगाव मतदारसंघातून काढून व नावेलीच्या मतदार यादीत जोडून त्यांना नावेलीच्या पोटनिवडणुकीत उभे करण्याचा निर्णय कोणी घेतला, हा सवाल गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीच्या नेत्यांना विचारला पाहिजे असे वक्तव्य करून या निर्णयाबद्दलची नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  

नावेली मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या 372 मतांनी हरलेल्या कुतिन्हो यांनी या पराभवास माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केली होती. या पराभवामुळे दखावलेल्या कुतिन्हो यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेशा केला. यावर फालेरो यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Faleros displeasure with the Congress leaders who nominated Pratima Kutinho)

महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा राजीनामा; आपमध्ये...

पक्षकार्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आपण केरळमध्ये गेलो होतो.  जिल्हा पंचायतीच्या नावेलीच्या पोटवनिडणुकीत काॅंग्रेसची स्थिती खराब होती. आपण तीन कोपरा बैठका घेतल्याने ती सुधारली व कमी मताच्या फरकाने काॅंग्रेस उमेदवाराचा पराभव झाला, असा दावा फालेरो यांनी केला. नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघात नावेली, तळावली, धर्मापूर - शिरली व सारझोरा या पपंचायतीचा समावेश होतो. यातील धर्मापूर - शिरली व सारझोरा या पंचायतींचा विधानसभेच्या वेळ्ळी मतदारसंघात समावेश होतो. या दोन पंचायतींत कमी प्रतिसाद मिळाला हेही काॅंग्रेस उमेदवाराच्या पराभवाचे एक कारण आहे, असे त्यांनी सांगितले. 

या पोटनिवडणुकीत अपक्ष एडविन कार्दोझ निवडून आले असले तरी त्यांची आघाडी कमी झाली आहे. इतर पक्षही रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीतील समीकरणे बदलली होती, असेही त्यांनी सांगितले. कोणी पक्ष सोडून जातो तेव्हा दुःख होतेच. पक्षाची सध्याची स्थिती खराब आहे. आम्हाला 13 आमदार सोडून गेले. जिल्हा पंचायत निवडणूक व ही पोटनिवडणुकतही आम्हो हरलो. जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर लढू नये ही सूचना आपण केली होती, असे त्यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या