अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

साहित्य संमेलन 22, 23 व 24 एप्रिलला होणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत (Press Conference) जाहीर केले.
Bharat Sasane

Bharat Sasane

Dainik Gomantak

उदगीर: येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे (Bharat Sasane) यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. हे संमेलन 22, 23 व 24 एप्रिलला होणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत (Press Conference) जाहीर केले.

<div class="paragraphs"><p>Bharat Sasane</p></div>
गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांवर पोहचला; आज कृती दलाची बैठक

संमेलनाच्या नियोजनाला नव्या वर्षाच्या प्रारंभीच सुरवात झाली. येथील महाराष्ट्र (Maharashtra) उदयगिरी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची आज बैठक झाली. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट, डॉ. रामचंद्र देखणे, भारत सासणे, प्रवीण दवणे, अच्युत गोडबोले, जयदेव डोळे यांच्या नावाची चर्चा होती. महामंडळाच्या सदस्यांनी बैठकीत सासणे यांच्या नावावर शिक्कामोर्बत केले. कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलन नियोजनावर सखोल चर्चा होऊन 22, 23 व 24 एप्रिलला संमेलन घेण्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने संमेलनाची तयारी सुरू केली आहे.

<div class="paragraphs"><p>Bharat Sasane</p></div>
बाबू आजगावकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता अंधूक

आजच्या बैठकीला ठाले पाटील यांच्यासह महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रा. मिलिंद जोशी, विलास मानेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर आदी उपस्थित होते.

‘मसाप’ शाखेला डावलल्याची चर्चा?

उदगीर (Udgir) शहरात दोन वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डावलल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ठाले पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘मसाप’ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या संयुक्त मागणीमुळेच हे संमेलन उदगीरला घेण्याचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com