अल्पा कुंभारजुवेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्‍कार

वार्ताहर
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

तन मन धन समर्पित करून शिक्षा दान करणे म्हणजे काय हे ज्‍येष्ठ शिक्षिका अल्पा कुंभारजुवेकर यांच्याकडे पाहिल्यावर समजते. गेली ३७ वर्षे त्यांनी गोव्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळामध्ये समर्पित भावनेने शिक्षा दान केल्यामुळे त्यांना लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

पर्वरी : तन मन धन समर्पित करून शिक्षा दान करणे म्हणजे काय हे ज्‍येष्ठ शिक्षिका अल्पा कुंभारजुवेकर यांच्याकडे पाहिल्यावर समजते. गेली ३७ वर्षे त्यांनी गोव्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळामध्ये समर्पित भावनेने शिक्षा दान केल्यामुळे त्यांना लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. तसेच त्यांनी आपल्या सहकारी ज्‍येष्‍ठ तसेच कनिष्ठ शिक्षक शिक्षिकेबरोबर कधीच भेदभाव केला नाही. सतत त्यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंध ठेवून काम केले आहे. त्यामुळे त्या मुलांमध्ये तसेच सहकाऱ्यांमध्ये आवडत्या शिक्षिका होत्या. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, असे उद्‍गार रसिका गावकर यांनी काढले.

सरकारी प्राथमिक शाळा आरडी सुकुर या शाळेतून त्या नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. सेवानिवृत्तीबद्दल आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याध्‍यापिका श्वेता देसाई, वैष्णवी मळीक व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.
सुरवातीला श्वेता देसाई यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षिका कुंभारजुवेकर यांचा शाल, श्रीफळ व सरस्वतीची मूर्ती भेट देऊन  सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना शिक्षिका कुंभारजुवेकर यांनी आपल्याला समजून घेऊन सर्व कामांत सहकार्य केल्याबद्दल त्‍यांनी सर्वांचे आभार मानले.

 वैष्णवी मळीक यांनी सूत्रसंचालन, वर्षा देसाई यांनी आभार मानले. 

संबंधित बातम्या