शेतकापणी यंत्रे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सरकारचा शेतकापणी तथा मळणी मशीनचा भाडे दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही, असा दावा शिवोली मतदारसंघातील काँग्रेसचे गट अध्यक्ष राजन घाटे यांनी केला आहे. त्यासंदर्भात या भागातील शेतक्यांनी स्वत:ची कैफियत आपल्यासमोर मांडली असल्याचे ते म्हणाले.

म्हापसा : सरकारचा शेतकापणी तथा मळणी मशीनचा भाडे दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही, असा दावा शिवोली मतदारसंघातील काँग्रेसचे गट अध्यक्ष राजन घाटे यांनी केला आहे. त्यासंदर्भात या भागातील शेतक्यांनी स्वत:ची कैफियत आपल्यासमोर मांडली असल्याचे ते म्हणाले.

श्री. घाटे पुढे म्हणाले, शिवोली मतदारसंघातील शेतकरी माझ्याकडे तक्रारी घेऊन आले होते. त्यांचे म्हणणे असे होते की शेतकापणी तथा मळणी मशीन संदर्भातील शासकीय भाडे दर खूपच जास्त आहे. तो दर शेतकऱ्यांना मुळीच परवडणारा नाही. कृषी कार्ड व एक-चौदाचा उतारा सादर करून दोन हजार रुपये प्रतितास भाडे द्यावे लागते. शे
ती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना खूपच मेहनत घ्यावी लागते. तसेच, मोठा खर्चही करावा लागतो आणि आणि त्याशिवाय शेतकापणी व मळणीसाठी त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागतो. शेतकऱ्यांना हे परवडत नसल्याने त्यांना सरकारने आणखीन सूट द्यावी, अशी मागणी श्री. घाटे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या