म्हादई प्रश्नावरून शेतकऱ्यांचा गोवा सरकारला सवाल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

म्हादई नदीवरील गांजे येथे असलेल्या बंधाऱ्यामुळे  आज या बंधाऱ्यात अडवलेले पाणी थेट बागायतीत पोचले आहे.

गुळेली: म्हादई नदीवरील गांजे येथे असलेल्या बंधाऱ्यामुळे  आज या बंधाऱ्यात अडवलेले पाणी थेट बागायतीत पोचले आहे. या विषयी सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात गांजे येथे बंधाऱ्याव्दारे पाणी अडवले जाते.असे बंधारे म्हादई व रगाडा नदीवर बांधलेले आहेत. दरवर्षी पाणी अडविले जाते परंतु कधीच पाणी  बागायीत पोचले नव्हते बागायतीच्या काठोकाठ पाणी भरलेले असायचे. मात्र यंदा हे पाणी अडवण्याचे प्रमाण वाढल्याचे  बागायतदारांचे म्हणणे आहे.

धामसे येथील सत्यवान गावकर या बागायतदाराने दिलेल्या माहितीनुसार आज बंधाऱ्यामुळे अडविण्यात आलेले पाणी थेट बागायतीत पोचले असून या ठिकाणी घातलेली मिरची  रोपे बुडाली आहे तसेच मका, हळसांदे, चिटकी  आदी भाजीपाला बुडाला असून यामुळे नुकसान झाले आहे.

यंदा बंधाऱ्यात पाणी साठविण्याची क्षमता वाढवली असल्याची शंका बागायतदारांनी दिली आहे.गेल्या काही वर्षोपासून ह्या बंधाऱ्याव्दारे पाणी अडवले जाते होते परंतु कधी बागायती तीत पाणी पोचले नव्हते मात्र यंदाच पाणी कसे पोचले असा सवाल बागायतदारांनी उपस्थित केला आहे. या पाण्यामुळे झालेले नुकसान कोण भरुन देईल असा सवालही या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गोवा राज्यातील 14 अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा -

संबंधित बातम्या