IIT Goa Protest: 'आयआयटी' विरोधात तीव्र आंदोलन करु

IIT Goa धरणे-आंदोलनात दर दिवशी शेतकरी गटागटांने आंदोलनात सहभागी होऊ लागले आहे.
IIT Goa
IIT GoaDainik Gomantak

IIT Goa Protest: ‘आयआयटी’ नकोच, असा नारा देत शेतकऱ्यांनी आपल्या मालकी हक्काच्या कागदपत्रांसह दुसऱ्या दिवशीही दांडो-सांगे येथे ‘सांगे बचाव’च्या झेंड्याखाली निदर्शने केली. धरणे-आंदोलनात दर दिवशी शेतकरी गटागटांने आंदोलनात सहभागी होऊ लागले आहे. तसेच शेतकऱ्यांना पोलिस स्थानकावर हजेरीसाठी बोलाविण्यात येत त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी दत्ताराम गावकर म्हणाले, शेतकरी कागदपत्रे नसताना आपली जमीन जात असल्याचे चित्र निर्माण करतात, असा सर्रासपणे आरोप करून शेतकऱ्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणून धरणे-आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आपल्या जमिनीच्या कागदपत्रांसह बसलेले आहे. आमच्या शेत जमिनी वगळून तुम्ही काहीही करा, पण शेतकऱ्यांना पोटावर मारू नका. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे.

IIT Goa
Goa Congress Protest : काँग्रेसचं आंदोलन; बंडखोर आमदार सिक्वेरांच्या पुतळ्याची कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

रूपाबाई चारी म्हणाल्या, आयआयटीला आमची जमीन जाणार म्हणून शेतकरी आपल्या शेत जमिनीत उतरून आंदोलन करतात, म्हणून आमच्या मुलांना पोलिस ताब्यात घेत आहेत. ही दडपशाही असून शेतकरी आता कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाहीत.

मागण्यांचा विचार करा: मिलाग्रीस कुलासो म्हणाले, आम्हांला कोणी शिकवून आणत नसून आम्ही आमच्या पोटाचा विचार करून एकत्र येत आहोत. पण राजकीय वजन वापरून पोलिस प्रत्येक गोष्टीत दडपण आणत आहेत. आमच्या मागण्यांचा विचार आता केलाच पाहिजे. जोपर्यंत आमचा विचार केला जाणार नाही, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे.

शेतकऱ्यांना चिंता: गेली अनेक वर्षे शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आयआयटीमुळे जाणार असल्याच्या भितीमुळेही काही शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेती गेल्यास काय करावे, चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com