चिंचोणेत सामूहिक शेतीला प्रारंभ

चिंचोणे येथील शेतकऱ्यांनी 170 हेक्टर जमीन सामुदायिक शेतीद्वारे लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती लागवडीचा शुभारंभ केला.
चिंचोणेत सामूहिक शेतीला प्रारंभ
Farming in GoaDainik Gomantak

सासष्टी : चिंचोणे येथील शेतकऱ्यांनी 170 हेक्टर जमीन सामुदायिक शेतीद्वारे लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती लागवडीचा शुभारंभ केला.

या शेती लागवडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे डॉन बॉस्को सोसायटीचे फा. जॉर्ज क्वाद्रोस यांनी सांगितले. या प्रसंगी आमदार क्रुझ सिल्वा, चिंचोणे कोमुनिदादचे आग्नेलो फुर्तादो, झोनल कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो उपस्थित होते.

Farming in Goa
खाणींची महसुली तूट ‘मोपा’ भरुन काढणार

चिंचोणे येथील शेतकऱ्यांनी सामुदायिक शेती करण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारच्या क्रांतीलाच सुरवात केली आहे, असे आमदार सिल्वा यांनी पत्रकारांना सांगितले. कित्येक वर्षांपासून ही शेत जमीन पडंग होती. कृषी खात्याने शेती लागवडीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य देऊ केले आहे. कृषीउद्योग हा सध्याच्या परिस्थिती उत्तम आहे व युवकांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व जास्तीत जास्त युवकांनी शेती लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असेही सिल्वा म्हणाले.

वेळ्ळी मतदारसंघात लागवड होत नसलेली जमीन आहे, तिथे शेती किंवा इतर कृषीपूरक उद्योग करण्यासाठी नागरीकांना खास करुन युवकांना प्रोत्साहित केले जाईल, असे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com