Goa: शिरवडेत महिलेवर जीवघेणा हल्ला; दोन संशयितांना अटक

handcuffs.jpg
handcuffs.jpg

सासष्टी: शिरवडे येथील कुबा मस्जिदजवळ कॅनवी पिरीस यांची अडवणूक करून खुनी हल्ला केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित आयुब सयिद आणि अनिल याना अटक करण्यात आली आहे. ही घटना काल संध्याकाळी 6.40 वाजता घडली. (Two suspects arrested in case of Fatal attack on a woman in Shiroda)

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनवी पिरीस हा दुचाकीने मस्जिद परिसरातून जात असताना, चारचाकी घेऊन रस्त्याच्या मदोमद थांबलेल्या आयुब सयिद आणि अनिल यांना हटण्याची विनंती केल्यावर दोघाही संशयितांनी चारचाकीतून लोखंडी रॉड आणि कोयत्याने कॅनवीवर खुनी हल्ला केला. या प्रकरणी खुनी तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोघांनाही अटक केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॅनवी हॉस्पिसियो इस्पितळात उपचार घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र

चंद्रवाडा-फातोर्डा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, पोलिसांनी एकूण 31 जणांच्या जाबानी नोंद केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी संशयित रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल यांना अटक केली आहे. 

फातोर्डा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ही घटना सोमवारी 8 मार्च रोजी उघडकीस आली. जलस्रोत विभागाचे कंत्राटदार मिंगेल मिरांडा (वय 65) व त्याची सासू कॅटरीना पिंटो (वय 85) यांचा संशयितांनी धारदार शस्त्राने भोसकून खून केला व घरच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोअर रुममध्ये शस्त्र लपवून ठेवला. मुलगी झेजुलीना मिरांडा यांना स्टोअर रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला वडील व आजीचा मृतदेह त्यांना दिसल्यावर तिने त्वरित जावून तक्रार नोंद केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांना मयत मिंगेल यांच्याकडे काम करणारे संशयित रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल हे मजूर गायब झाल्याचे निदर्शनास आल्यावर या मजुरांचा या खुनात सहभाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोवा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेजारील राज्यात पोलिस पथके पाठविली होती. त्यानंतर दादर पश्चिम मुंबई येथून त्या संशयितांना ताब्यात घेतले. कामाचे पैसे न दिल्याने खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com