फादर आग्नेल हायर सेकेंडरी स्कूल पिलरचा विद्यार्थी 'या' पुरस्काराचा ठरला मानकरी

अंतुषने अंडर-18 ज्युनियर मुलांच्या गटात चॅम्पियनशिप जिंकली आहे. या स्पर्धेत एकूण 300 विद्यार्थी सहभागी झाले होते
फादर आग्नेल हायर सेकेंडरी स्कूल पिलरचा विद्यार्थी 'या' पुरस्काराचा ठरला मानकरी
Champion Award Dainik gomantak

वास्को : फादर आग्नेल हायर सेकेंडरी स्कूल पिलरचा अकरावीचा विद्यार्थी अंतुष मुकुंद गौस नुकत्याच झालेल्या 16 व्या ऑल गोवा (goa) स्काय मार्शल आर्ट राज्यस्तरीय चॅम्पियनशिप 2021-22 मध्ये 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' पुरस्कार (Award) पटकावला.

Champion Award
फॅशन ट्राईड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत 'हे' बनले विजेते..!

नावेली येथील मनोहर पर्रीकर स्टेडियमवर ही स्पर्धा (Competition) पार पडली. स्‍काय असोसिएशन ऑफ गोवा यांनी स्‍काय असोसिएशन ऑफ स्‍पोर्ट्स अँड युथ अफेयर्स गव्‍हमेंट, गोवा स्‍पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा, गोवा ऑलिंपिक असोसिएशन, स्‍काय फेडरेशन ऑफ इंडिया, स्‍कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, युथ अफेअर्स आणि स्‍पोर्ट्स सरकारच्‍या मंत्रालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित केली होती.

Champion Award
अभिनय स्पर्धेत पटकावले राष्ट्रीय पारितोषिक

अंतुषने अंडर-18 ज्युनियर मुलांच्या गटात चॅम्पियनशिप जिंकली आहे. या स्पर्धेत एकूण 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. अंतुष हा मुरगाव उत्पादन शुल्क निरीक्षक मुकुंद गौस यांचा मुलगा आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल त्याचे शाळा व्यवस्थापन, कुटुंबीय व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.