फातोर्डा फाॅरवर्डचे उमेदवार आघाडीवर; पहिल्या चार प्रभागातील चारही उमेदवार विजयी

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

मडगाव पालिकेची मतमोजणी सुरु झाली आहे.

मडगाव: मडगाव पालिकेची मतमोजणी सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात मतमोजणी हाती घेण्यात आलेल्या चार प्रभागत गोवा फाॅरवर्ड पक्षाच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग 1 मध्ये फ्रान्सिस जोआन्स, प्रभाग 2 मध्ये जाॅनी क्रास्टो, प्रभाग 3 मध्ये लिंडन परेरा व  प्रभाग 4 मध्ये पूजा नाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आघाडी घेतली आहे. 

पहिल्या चार प्रभागातील चारही उमेदवारी विजयी

मडगाव पालिकेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या चारही प्रभागांच्या मतमोजणीत गोवा फाॅरवर्ड पक्षाच्या फातोर्डा फाॅरवर्डचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 1 मध्ये फ्रान्सिस जोआन्स, प्रभाग 2 मध्ये जाॅनी क्रास्टो, प्रभाग 3 मध्ये लिंडन परेरा व  प्रभाग 4 मध्ये पूजा नाईक विजयी झाल्या. पूजा नाईक या माजी नगराध्यक्ष, तर जाॅनी क्रास्टो व लिंडन परेरा माजी नगरसेवक आहेत. फ्रान्सिस जोआन्स हे पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले आहेत. 

संबंधित बातम्या