Goa Crime: 3.5 लाखांच्या ब्रेसलेट चोरीचा प्रयत्न फसला

साडे तीन लाखांचे ब्रेसलेट घेऊन त्याचे पैसे न देताच पळून जाणाऱ्या चोरट्यांना फातोर्डा पोलिसांनी दाबोळी विमानतळ परिसरात अटक केली.
Fatorda Police Arrested Gold Thief
Fatorda Police Arrested Gold ThiefDainik Gomantak

Goa Crime: साडे तीन लाखांचे ब्रेसलेट घेऊन त्याचे पैसे न देताच हैद्राबादकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवराज अगरवाल या हैदराबादी युवकाला फातोर्डा पोलिसांनी दाबोळी विमानतळ परिसरात काल रात्री अटक केली. संशयिताला मडगाव न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक हे ब्रेसलेट खरेदी करण्यासाठी पणजी येथील ब्ल्यू स्टोन या कंपनीत गेला होता. तिथे त्याने 3.34 लाख रूपये किमतीचे ब्रेसलेट पसंत केले. पण आपल्याकडे पैसे नाहीत.

माझा मित्र मडगाव येथे असून तिथे त्याच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या माणसाला माझ्याबरोबर पाठवू शकाल का? असे त्याने विचारल्यावर त्या कंपनीने पुंडलिक लोटलीकर याला त्याच्या बरोबर पाठविले.

Fatorda Police Arrested Gold Thief
Goa Crime: गोव्यात 2022 मध्ये गुन्हेगारी प्रकरणांत वाढ

ते दोघेही मडगाव एसजीपीडीए मार्केटमध्ये असलेल्या आयनॉक्स थियेटरजवळ आले. तिथे पोहोचल्यावर संशयिताने लोटलीकर याला माझा मित्र वर बसला आहे, त्याला ही ब्रेसलेट दाखवून पैसे घेऊन येतो, असे सांगून त्याने ते ब्रेसलेट आपल्या हातात घेतले आणि वर सिनेमागृहात गेला.

तिथून मागच्या एक्झीट दरवाजाने तो बाहेर पडला आणि पसार झाला. बराच वेळ आत गेलेला हा माणूस बाहेर येत नाही, असे दिसून आल्यावर लोटलीकर याला संशय आला. त्याने फातोर्डा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Fatorda Police Arrested Gold Thief
Pilerne Fire: ‘बर्जर’हटाओ; साळपे गाव बचाओ!

मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास

फातोर्डा पोलिसांनी संशयिताचा मोबाईल ट्रॅक केला असता तो आधी पर्वरी येथे असल्याचे दिसून आले. त्यानंतर तो कळंगुट येथे असल्याचे आढळून आले.

शेवटी तो दाबोळी विमानतळ परीसरात असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन चोरीचा माल हस्तगत केला. तो विमानाने हैदराबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत होता,अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com