Fatorda Explosion: फातोर्डा येथे स्क्रॅपयार्डमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

चांदवाडो-फातोर्डा येथे असलेल्या स्क्रॅपयार्डमध्ये वाहन कापताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
Gas Cylinder Explosion|Fatorda
Gas Cylinder Explosion|FatordaDainik Gomantak

Gas Cylinder Explosion in Fatorda: चांदवाडो-फातोर्डा येथे असलेल्या स्क्रॅपयार्डमध्ये वाहन कापताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दोन कामगार गंभीर जखमी होण्याचा प्रकार घडला आहे. त्या दोघांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे स्थानिकांनी हे स्क्रॅपयार्ड इतर ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. आज झालेली ही तिसरी घटना असून यापूर्वी येथे अशाच दोन घटना घडलेल्या आहेत. हे प्रकरण सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडले.

यावेळी या स्क्रॅप यार्डमध्ये काम करीत असलेले दोघे कामगार गॅस कटरच्या मदतीने गाडीचा पत्रा कापण्याचे काम करीत होते. या दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि दोघेही गंभीररीत्या जखमी झाले.

Gas Cylinder Explosion|Fatorda
National Award: गोवा माहिती तंत्रज्ञान संचालक प्रवीण वळवटकर यांचा राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते सन्‍मान

आम्ही रस्ते अडवू...

एका स्थानिकाने सांगितले की, स्फोटाची ही तिसरी घटना होती. या यार्डमुळे येथील शेतांवर वाईट परिणाम होत आहे आणि वायू प्रदूषणाचा देखील त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे स्क्रॅपयार्डचे तत्काळ स्थलांतर करण्याची मागणी करणार आहोत. या स्क्रॅपयार्डवर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही फातोर्डा परिसरातील रस्ते अडवू.

Gas Cylinder Explosion|Fatorda
Goa Taxi Driver Assaulted : टॅक्सी चालकाला मारहाण करून केली टॅक्सीची चोरी; महाराष्ट्रातील दोघांना अटक

या स्क्रॅप यार्डमुळे येथील परिसर धोक्याचा बनला आहे. या ठिकाणी एकंदरीत 15च्या आसपास स्क्रॅप यार्ड असून जवळच लोकांची घरे आहेत. हे स्क्रॅपवाले रस्त्यावरच गॅस कटरच्या साहाय्याने गाडी कापण्याचे काम करतात.

यापूर्वी असाच स्फोट होऊन दोघा जणांचा मृत्यू झाला होता. या स्क्रॅपवाल्यांकडे नगरपालिकेचा व इतर कुठलाही परवाना नाही. - कामिलो बार्रेटो, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com