एफसी गोवाची स्पोर्टिंग क्लब पर्वरीशी भागीदारी

एफसी गोवाची स्पोर्टिंग क्लब पर्वरीशी भागीदारी
fc goa

पणजी: एफसी गोवाने (FC Goa) गतवर्षी साल्वादोर द मुंद पंचायतीशी करार करून आपल्या संघासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तेथील मैदान आंतरराष्ट्रीय निकषानुसार विकसित केले होते, आता स्थानिक युवा गुणवत्ता केंद्रस्थानी ठेवून स्पोर्टिंग क्लब ऑफ पर्वरीसमवेत भागीदारी केली आहे. (FC Goa Partnership with Sporting Club Porvorim)

स्पोर्टिंग क्लब ऑफ पर्वरीचे मुख्यालय साल्वादोर द मुंद येथे आहे. नव्या करारानुसार स्पोर्टिंग क्लब ऑफ पर्वरीस एफसी गोवा फुटबॉलविषयक (Goa Football) तांत्रिक मार्गदर्शन करेल. पर्वरी मतदारसंघातील स्पोर्टिंग क्लब ऑफ पर्वरीतर्फे खेळणाऱ्या 14 आणि 18 वर्षांखालील वयोगटातील युवा खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी एफसी गोवाचे प्रशिक्षक अभ्यासक्रम विकसित करतील. गोवा फुटबॉल असोसिएशन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या युवा लीग स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब ऑफ पर्वरी सहभागी होणार आहे. या भागीदारीअंतर्गत 10  व 12 वर्षांखालील मुला व मुलींसाठी मासिक ग्रासरूट महोत्सव घेण्यात येईल.

एफसी गोवा-स्पोर्टिंग क्लब पर्वरी यांच्यातील भागीदारीनुसार गुणवत्ता शोध निवड चाचणी घेण्यात येणार असून 18 वर्षांखालील वयोगटात 1-1-2004 रोजी किंवा नंतर जन्मलेला, तर 14 वर्षांखालील वयोगटात 1-1-2009 रोजी किंवा नंतर जन्मलेला खेळाडू भाग घेऊ शकेल. मासिक ग्रासरूट फुटबॉल महोत्सवासाठी 12 वर्षांखालील वयोगटात 1-1-2010 रोजी किंवा नंतर जन्मलेला, तर 10 वर्षांखालील वयोगटात 1-1-2012 रोजी किंवा नंतर जन्मलेला खेळाडू भाग घेऊ शकेल. माहितीसाठी साल्वादोर द मुंद पंचायत कार्यालय अथवा स्टीफन (+917218656129/988177882) यांच्याशी पाच जुलैपर्यंत संपर्क साधता येईल. निवड चाचणीत फक्त पर्वरी मतदारसंघातील खेळाडूच भाग घेण्यास पात्र असेल. त्यासाठी पालकांचे आधार कार्ड अथवा निवडणूक ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com