Goa FDA Raid : धडक कारवाईनंतर ‘एफडीए’ पुन्‍हा सुस्त

सुमार दर्जाच्या काजूंची विक्री; विक्रेत्यांना जरब बसण्‍यासाठी खात्याकडून सातत्‍य आवश्‍‍यक
Fake Cashew in Goa | FDA Raid
Fake Cashew in Goa | FDA RaidDainik Gomantak

Goa FDA Raid : राज्यात दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाईचे पदार्थ तसेच काजूगराची आयात गोव्यात झाली होती. अन्न व औषध प्रशासन खात्याने काही भागात एक दिवस धडक कारवाई केल्यानंतर ही मोहीम सुरूच राहील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घोषणा केली. मात्र प्रत्‍यक्षात कारवाईत सातत्‍य दिसत नाही. या खात्याने कमी दर्जाच्या काजू विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेली मोहीम फार्स ठरू नये, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. राज्यातील बाजारपेठा तसेच किनारपट्टी भागात विविध रंगामधील तसेच विशिष्ट स्वादाचे काजूगर विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याकडून कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी तसे चित्र सध्या दिसत नाही. या खात्याने कारवाईची मोहीम सुरू केल्यानंतर कमी दर्जाची काजूगर व्यापाऱ्यांनी विक्री बंद केली असली तरी तो माल अन्‍यत्र हलवला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात काजूगर विक्रीचे व्यापारी आहेत.

किनारपट्टी भागात तसेच मुख्य मार्केटात काजूगराची दुकाने थाटलेली आहेत मात्र तपासणी करण्यामध्ये खात्याकडून कमतरता दिसून येत आहे. खात्याची स्वतःची लेबोरेटरी आहे मात्र तपासणीवेळी जमा केलेल्या काजूगर नमुन्याचा अहवालालाही उशीर होत आहे.

Fake Cashew in Goa | FDA Raid
Mapusa Municipal Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; म्हापसा पालिकेकडून तिघांना नोटीस

दीपावलीनिमित्त गोव्यात मोठ्या प्रमाणात मिठाई तसेच मावा वाहनाने तसेच रेल्वेने गोव्यात आयात झाला होता. मात्र, एक दोन ठिकाणी कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खात्याने कठोर मोहीम राबवण्याऐवजी त्यात सुस्तपणा आला आहे. दिपावलीसाठी आणलेला माल व्यापाऱ्यांनी विकला. पण त्याच्या दर्जाबाबत या खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केलेल्याचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे या खात्याकडून होत असलेली तपासणी म्हणावी तेवढी तीव्रपणे होत नाही.

...तर जाग्यावरच विल्हेवाट

काजूगर तपासणीवेळी जर त्याचा दर्जा कमी असल्याचे आढळून आल्यास त्याची तेथेच विल्हेवाट लावली जाते. संशयास्पद काजूगरांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते. संशयास्पद वाटणाऱ्या काजुगरांची विक्री करण्यास विक्रेत्याला बंधन घातले जात नाही. मात्र, नमुन्याच्या अहवालात काजूगराचा दर्जा कमी असल्याचे उघड झाल्यास त्याला तो माल विकण्यास मनाई केली जाते, अशी माहिती संचालिका ज्योती सरदेसाई यांनी दिली.

खात्याकडून या आहेत अपेक्षा

* राज्‍यात निकृष्‍ट दर्जाच्‍या काजूविक्रीवर जरब बसावी, अशी पारंपरिक, जुन्‍या काजू विक्रेत्‍यांची अपेक्षा आहे.

* माध्‍यमांतून या विषयी आवाज उठताच काही भागांत कारवाई होते. त्‍यानंतर ‘ये रे माझ्‍या मागल्‍या’च.

* राज्‍यभर तपासणी मोहीम चालावी. ‘एफडीए’च्‍या कारवाईमुळे बेकायदा विक्री थांबावी, असा सूर नागरिकांतून व्‍यक्‍त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com