नावेलीत फार्मसीवर छापा; अवैध मास्‍क, स्‍टीम इनहेलर, ऑक्सिमीटर जप्‍त

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कोविड व्यवस्थापन उपकरणाची नियमांचे उल्लंघन करून पॅकेज केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९७ एन ९५ मास्क, १२ स्टीम इनहेलर आणि ६ ऑक्सिमिटर जप्त केले. यावेळी पास्कॉल वाज आणि मेल्वीन फुर्तादो यांनीही साहाय्य केले.

सासष्टी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यमापन खात्याने सासष्टी तालुक्यात नावेलीतील दोन फार्मसीमध्ये कायद्याचे उल्लंघन करून मास्क, स्टीम इनहेलर आणि ऑक्सिमिटर अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी शुक्रवारी छापा मारला. 

योळी १९७ एन ९५ मास्क, १२ स्टीम इनहेलर आणि ६ ऑक्सिमिटर जप्त केले. वैद्यमापन खात्याचे नियंत्रक प्रसाद शिरोडकर, उपनियंत्रक ए. एन. पंचवाडकर, उपनियंत्रक नितीन पुरुषन यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यमापन खात्याचे निरीक्षक डी. एन. मापारी यांनी ही कारवाई केली. कोविड व्यवस्थापन उपकरणाची नियमांचे उल्लंघन करून पॅकेज केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९७ एन ९५ मास्क, १२ स्टीम इनहेलर आणि ६ ऑक्सिमिटर जप्त केले. यावेळी पास्कॉल वाज आणि मेल्वीन फुर्तादो यांनीही साहाय्य केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या