भीती सर्वांची चावी!

भीती सर्वांची चावी!
भीती सर्वांची चावी!

जो घाबरला तो संपला. त्याचा कार्यभाग बुडाला म्हणायला हरकत नाही. बालपणात ही भीती आपणच निर्माण करायचे पुण्य करत असतो, तर तारुण्यात आपण स्वतःच ती जवळ करतो. करिअर करताना  धोका न स्वीकारता मळलेल्या वाटेने जाणे पसंत करतो, त्यातून स्वतःचे नुकसान करत राहतो. जीवनातील आनंदाला  त्यातून आपण मुकतो ते वेगळेच.

भीती मानवाच्या प्रगतीला नेहमीच खीळ आणते. साधे शाळेतले उदाहरण घेऊया. परीक्षेच्या वेळी काहीजण पर्यवेक्षकाला चुकवून नक्कल करण्याच्या खटाटोपात असतात, त्यांचे हे चाळे  अन्य परीक्षार्थीच्या लक्षात येतात. पण पर्यवेक्षकापर्यंत कोणीही त्याची तक्रार करायला कोणी धजत नाही. कोणी म्हणतील पेपर लिहिण्याच्या गडबडीत कोण लक्ष  देतो? वरवर हे कारण योग्य वाटत असले, तरी तक्रार करायला कोणी धजावत नाही, त्याचे एक कारण मनातील भीती. नोकरदारांना देखील याचा अनुभव येतो. नियम धुडकावून अनेकजण व्यवहार असतात, पण आपणहून कोणीही त्यावर कृती करणार नाही. कोणी तक्रार केली, तर मात्र कृतिदलाला नाममात्र का होईना हालचाल करावी लागते आणि कृती करताना देखील त्या अमक्याने तुमची तक्रार केली म्हणून नाईलाजाने आम्हाला कृती करावी लागते  स्पष्टीकरण करतात. ह्या सर्वांचे  मूळ आहे भिती. वास्तविक आपण शिक्षण का घेतो तर भिती दूर व्हावी म्हणून ना!

भीतीने गाळण उडणे व पराभूत होणे हे खेळात स्पर्धेत येते. एकदा म्हणे यमराजानी आपल्या दूतांना वर्षाचा कोटा पूर्ण होण्यासाठी आकडा दिला प्रमाणे पृथ्वीवरील माणसे मेली. पण  यमराजाने जेव्हा आकडेवारी पाहिली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, कि कोटा पेक्षा जास्ती संख्या आहे. त्यांनी ह्याचे कारण विचारले तेव्हा दूत म्हणाले, आम्ही सांगितल्याप्रमाणे कोटा सांगितल्या प्रमाणेच माणसे उचलली, पण जी जादा मेली ती केवळ भीतीने कोरोनासंकट येण्यापूर्वी जगातील प्रमुख जंगलात वणवे लागण्याच्या घटना घडत होत्या. अमेझोनच्या जंगलामधील वणवा शांत होतो तोच ऑस्ट्रेलियात वणवा लागला. तेथून या वनव्याची बातमी सैबेरियात पोचली. तो धुमसत असताना उत्तर अमेरिका खंडात वणवा पेटू लागला. पर्यावरणातील  बदलाची भिती तज्ञांनी व्यक्त केली, ती आता खरी ठरू लागली आहे. एका तेलवाहू जहाजातून तेल सांडल्याने किनारपट्टीतील जैवसृष्टी धोक्यात आली आहे.

आता तर कोरोनाच्या विळख्यात जगच सापडले आहे. हे सर्व भीतीचे दाखले तर माणसाच्या व्यवहाराला नाइलाजाने आवर आणतात त्यावर स्वतःच्या बुद्धीने इलाज  शोधणे आपल्या हाती असते. भिती  दूर करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. उंच कड्यावर चालत जाणे, पॅराशूटमधून जमिनीवर झेपावणे,  उंच ठिकाणावरून समुद्रात झेप घेणे आदी जीवघेणे उपक्रम माणूस करत असतो. ते करण्यापूर्वी आपल्यातील भिती  तो दूर करूनच साहस करत असतो. जो घाबरला तो संपला. त्याचा कार्यभाग बुडाला म्हणायला हरकत नाही. बालपणात ही भीती आपणच निर्माण करायचे पुण्य करत असतो, तर तारुण्यात आपण स्वतःच ती जवळ करतो. करिअर करताना  धोका न स्वीकारता मळलेल्या वाटेने जाणे पसंत करतो, त्यातून स्वतःचे नुकसान करत राहतो. जीवनातील आनंदाला  त्यातून आपण मुकतो ते वेगळेच. वय वाढत जाते, तेव्हा निराशेचे सुस्कारे सोडणे एवढेच  कळते. तेव्हा मी हे पाऊल  उचलले असते तर..! पण त्याला उशीर झालेला असतो.

निव्वळ भीती पोटी हे सगळे घडून जाते. भीती दूर ठेवल्यानेच मोठं मोठे पराक्रम शूर वीर पुरुष करू शकले. मग तो नेपोलियन असो की आपले शिवाजी महाराज असो. त्यांनी भीतीला कवटाळले असते तर वेगळाच इतिहास लिहिला गेला असता. भीती दूर केली  तर जिद्द मनात येते त्यातून पराक्रम घडण्याची बीजे रोवली जातात. आपले  जवान पहा. ह्या  क्षेत्रात  तरुणांनाच  संधी  जास्त  प्रमाणात असते. कारण हेच वय असते,  कि तुम्ही  भीती  दूर  करून तुमच्याकडून  पराक्रम  नोंदविले जाऊ  शकतो. गरुडाप्रमाणे झेप  घेण्याचे  हेच वय असते. एका  पंखात  जागी  ठेवणारी  स्वप्ने तर  दुसऱ्या पंखात  जिद्द, परिश्रम  करण्याची  ताकत  ह्या बळावर  आपण  गरुडझेप  घेतो. जगासाठी  तुम्ही  उदाहरण  ठरता. तुमचे चरित्र  इतरांना  प्रेरणा देणारे ठरते. दोन  बेडूक  ताक  असलेल्या  बरणीत  पडतात. त्यापैकी  एक  आत  जगणे  कठीण म्हणून तळ  गाठतो आणि  मरतो, या उलट  दुसरा वर-खाली  उड्या मारत राहतो.  ह्यातून  ते  ताक  बऱ्यापैकी  घुसळते  त्यातून लोण्याचा  थर  तयार  होतो,  त्यावर  बेडूक  चढून  बरणीबाहेर  पडू शकतो. भीतीने  आपल्यातील  शक्ती आपणच गमावून बसतो. ह्या उलट  भीती  दूर  केली, तर आपल्यातील  सुप्तगुण  जागृत होऊन  आपल्याकडून  कार्य  होत  राहते. कदाचित  त्याला ऐतिहासिक  रूपही येऊ शकते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com