गोव्यातील वन्यजीवांवर कोरोना संसर्गाचा विपरीत परिणाम

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

वन खात्याच्या वन्यजीव विभागाने राज्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेल्या बोंडलामध्ये प्रवेशबंदी जाहीर केलेली आहे

पणजी: राज्यामध्ये कोरोना महामारीचा फैलाव वेगाने होत असताना वन्य प्राण्यांमध्येही या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी वन खात्याच्या वन्यजीव विभागाने राज्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेल्या बोंडलामध्ये प्रवेशबंदी जाहीर केलेली आहे. (Fear of corona spreading among wildlife in Goa)

Covid-19: गोव्याने 1 लाख कोरोना रूग्णसंख्येचा टप्पा ओलांडला

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने नुकताच आदेश जारी केलेला असून त्यात पुढील आदेश येईपर्यंत सर्व अभयारण्ये, राष्ट्रीय पार्क आणि इतर संरक्षित क्षेत्रे तत्काळ बंद करावीत असे नमूद करण्यात आले आहे. एका सिंहाला कोविड-19 मुळे मृत्यू येण्याची घटना घडलेली असून केंद्र सरकारच्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर हा आदेश जारी झालेला आहे.

गोवा: 'राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा'

वरील आदेशानुसार, भगवान महावीर अभयारण्य, मोले, नेत्रावळी अभयारण्य, सांगे, खोतीगाव अभयारण्य, काणकोण, डाॅ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चोडण आणि म्हादई अभयारण्य, सत्तरी ही राज्यातील पाच अभयारण्ये बंद करण्याचा निर्णयही येत्या काही दिवसात येणार आहे.  माणूस आणि वन्यजीव हे एकमेकांच्या संपर्कात येऊन त्याद्वारे विषाणूचा संसर्ग होणे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ घेणे आवश्यक बनले होते असे वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या