वास्कोतील चिकन मार्केटबाहेर कचऱ्यामुळे पसरतेय डेंग्युची भीती

वास्कोतील चिकन मार्केटबाहेर कचऱ्यामुळे पसरतेय डेंग्युची भीती
Dengue.jpg

वास्को: वास्को (Vasco) चिकन मार्केटजवळ (Chicken Market) पसरलेला कचरा आरोग्यास धोकादायक ठरतो आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कचरा असलेल्या याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असुन ग्राहकांना रस्त्यावर प्रवेश करणे कठीण झाले. चिकन शॉपचे मालक आबिद बेपारी म्हणाले, “आम्ही पालिकेचे दरवाजे ठोठावुन कंटाळलो आहोत. लोक आमच्या दुकानांसमोरच्या घाणीमुळे बाजारात येण्याचे टाळतात आणि आमच्या मालाच्या गुणवत्तेवर शंका घेतात. कोणीही अस्वच्छतेबाबत गंभीर दिसत नाही.”  (Fear of dengue spreading due to garbage outside the chicken market in Vasco)

खारीवाडा येथील चिकन मार्केट जवळच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आरती नाईक यांनी डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली. "COVID-19 पूर्वीपासुनच आम्ही डेंग्यूच्या प्रकरणांमुळे मृत्यूशी झुंज देत आहोत तसेच साथीच्या आजारांमध्येही वाढ झाली आहे."

प्रभाग क्र. 13 च्या नगरसेवक शम्मी साळकर म्हणाल्या, “कचरा उचलणाऱ्या मजुरांना मी दररोज हा परिसर स्वच्छ करण्यासाठी विनंती केली आहे. मात्र समस्या अशी आहे की हा परिसर माझ्या प्रभागातील कचरा संकलनाचा बिंदू आहे. कचरा गोळा करणारे कर्मचारी त्या ठिकाणी कचरा टाकतात पण कचरा वाहणारी वाहने तो कचरा दररोज तो उचलत नाहीत. 

चिकन शॉप मालकांनी सांगितले की "कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारांनी हा कचरा उचलला जाईपर्यंत विशिष्ट शेडमध्ये ठेवणे आवश्यक असते परंतु, तसे होत नसल्याने भटके जनावरे, कुत्री आणि पावसामुळे कचरा पुढे पसरतो आहे."

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com