आफ्रिका खंडातून गोव्यात आलेल्या माशांमुळे नद्यांतील जैव संपदा नष्ट होण्याची भीती

आफ्रिका खंडातून गोव्यात आलेल्या माशांमुळे नद्यांतील जैव संपदा नष्ट होण्याची भीती
goa fish

पणजी: आफ्रिका( Africa) खंडातून येथे आलेल्या माशांमुळे(Fish) नद्यांतील(River) जैव संपदा( biodiversity) नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसऱ्या माशांना खाऊन जगणाऱ्या या माशांनी उच्छाद मांडला असून आजवर त्याने गोड्या पाण्यातील किती प्रकारचे मासे खाऊन नष्ट केले याची गणतीच नाही. अशा माशाच्या पैदाशीला अटकाव घातला पाहिजे असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी गोमन्तकशी बोलताना व्यक्त केले.(Fear of loss of river biodiversity due to fish coming to Goa from Africa)

ते म्हणाले, मोझांबिक तिलाप्ला व आफ्रिकन कॅट फिश गोव्यातील पाण्यात आले आहेत. पुरामुळे ते येथे आले की अन्य कोणत्या कारणावरून हे समजून येत नसले तरी येथील पाण्यात ते सध्या वावरत असून गोव्याच्या गोड्या पाण्यात मिळणाऱ्या माशांच्या कित्येक प्रजाती खाऊन संपवत आहेत हे सत्य आहे. मत्स्योद्योग खात्याने अशा माशांना अटकाव केला पाहिजे. त्यांना शोधून नष्ट केले पाहिजे आणि कोंबड्यांसाठी ते खाद्य म्हणून पुरवले पाहिजे. हा मासा घरात पाळणाऱ्या शोभीवंत माशांच्या जातीतील असला तरी तो तीन किलोपर्यंत वाढतो. तो इतर माशांना खाऊन टाकतो.

घरात पाळण्यासाठी कोणी असे मासे आणले होते, नंतर ते फेकले गेले किंवा ते पुरातून वाहत गोव्यापर्यंत पोचले हे समजून येत नाही. मात्र दक्षिण गोव्यात कासावली जवळील डबक्यांत हे मासे आढळले असल्याची माहिती देऊन त्यांनी सांगितले, की या माशांची प्रजनन शक्ती अचाट असल्याने पुढील वर्षी पावसापर्यंत त्यांची संख्या वाढलेली असेल शिवाय  गोड्या पाण्यातील गोमंतकीय मासे नष्ट झालेले असतील. ते टाळण्यासाठी ही डबकी उपसून त्यातील हे मासे काढून मारले गेले पाहिजेत. तरच गोमंतकीय मासे जगू शकतील. आता 1 जूनपासून मासेमारी बंदी अमलात येणार आहे. त्याकालावधीत मत्स्योद्योग खात्याने अशा माशांना अटकाव करण्याची मोहिम राबवली तरच स्थानिक गोड्या पाण्यातील मत्ससंपदा वाचू शकेल असे दिसते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com