‘अग्निपथ’मधून सेवा केली तर पुढे काय? : काँग्रेस

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेवर फर्नांडिस यांनी टीका केली.
‘अग्निपथ’मधून सेवा केली तर पुढे काय? : काँग्रेस
Agnipath SchemeDainik Gomantak

पणजी: केंद्र सरकारने जी सैन्य दलातील चार वर्षे सेवेसाठी अग्निपथ योजना आणली आहे, त्याचा विचार केला तर 17 व्या वर्षी भरती झालेला युवक 21 वर्षी सेवतून परतल्यानंतर त्यांना कोण नोकरी देणार आहेत. त्यांना काय शिपाई म्हणून दरवाजाबाहेर बसविणार आहात, असा सवाल काँग्रेसचे कॅ. व्हेरिएतो फर्नांडिस यांनी केला आहे.

(Fernandes criticized the Agneepath scheme introduced by the central government)

Agnipath Scheme
वडील म्हणाले, भिऊ नकोस, मी आहे पाठीशी.!

काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेवर टीका केली. फर्नांडिस म्हणाले की, युवकांचे आयुष्य उद्‍ध्वस्त होईल. कारण ग्रामीण भागातून अनेक युवक सैन्यात जाण्यासाठी तयार असतात. या सेवेनंतर संबंधितास निवृत्ती वेतन, ग्रॅज्युएटी काहीच मिळणार नाही. यापूर्वी भाजपच्या सरकारने 15लाख रुपये खात्यात येण्याचा जुमला केला. राज्य सरकारनेही 50 हजार नोकऱ्या देणार म्हणून निवडणुकीचे गाजर दाखविले.

संरक्षक दलात या योजनेमार्फेत येणाऱ्या 17 ते 21 या वयोगटातील युवकांचा वापर हा वापरा आणि फेकून द्या, असा होणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी वेगळी यंत्रणा आहे. ती काही खासगी मालकीची नाही. चार वर्षांच्या सेवेनंतर त्यांना कोणत्या नोकऱ्या तुम्ही देणार आहात? असा सवालही त्यांनी केला. या योजनेविरुद्ध जी देशभर निदर्शने किंवा दंगा उफाळला आहे, त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. परंतु संरक्षण क्षेत्रात अजिबात राजकारण आले नाही पाहिजे, ते स्वतंत्र असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com