Goa: प्रकाशमय होंड्यात फिरोजा शाह मात्र अंधारात; सविस्तर वृत्तांत

घरात विज नसल्याने घराभोवती झाडेझुडपे वाढलेली असल्याने रात्री अपरात्री सरपटणारे प्राणी घरात घुसतात, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागावे लागते.
Feroze Shah's family in Honda village is facing problems due to lack of electricity
Feroze Shah's family in Honda village is facing problems due to lack of electricityDainik Gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे, त्यामुळे येथे शासनाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा पोचाल्या आहेत, त्यात सर्वांना विज, रस्ते या सारख्या मुलभूत सुविधांचा समावेश आहे, परंतू यांच पंचायत क्षेत्रातील गजबजलेल्या अशा पोस्तवाडा परिसरात सन 1981 पासून वास्तव्यास असलेल्या फिरोजा शाह या मुस्लिम समाजातील महीलेचे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून अंधारात दिवस (lack of electricity) काढीत आहे असे जर कुणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण ते सत्य गेल्या सहा महिन्यांपासून विज जोडणी साठी विज खाते आणि होंडा पंचायत असे हेलपाटे मारून न्याय मिळत नसल्याने असाह्य बनलेल्या फिरोजा शाह यांनी सांगितलेल्या प्रकरणावरून दिसून आले आहे. (Feroze Shah's family in Honda village is facing problems due to lack of electricity)

फिरोजा शाह यांनी सांगितले सविस्तर वृत्त असे की होंडा पंचायतीच्या पोस्त वाडा प्रभागात 1981 साला पासून फिरोजा शाह यांचे घर त्यांचें सासरे इस्माईल शाह यांच्या नावावर होते, त्याप्रमाणे घराची रीतसर नोंदणी होंडा पंचायतीत झालेली आहे, त्यामुळे सदर घराला इस्माईल शाह यांच्या नावावर विज व पाण्याचे कनेक्शन मिळाले होते, परंतू काही वर्षांपासून या भागात खाण बंदी व त्यानंतर आलेल्या कोव्हीड 19 माहामारीच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शाह कुटुंबांच्या घराला दिलेल्या विज बिलाची थकबाकी वाढलेली होती, याची दखल घेऊन विज खात्याने सदर घराची विज जोडणी तोडण्यात आली होती.

Problems due to lack of electricity
Problems due to lack of electricityDainik Gomantak

त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी फिरोजा शाह यांच्या सासऱ्याचे निधन झाल्यानंतर सदर घर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून होंडा पंचायतीत त्यांचे पती व एक दीर यांच्या नावावर रीतसर हस्तांतरण (ट्रान्स्फर) झाले आहे, त्यामुळे फिरोजा शाह यांच्यानी वाळपई विज खाते कडे संपर्क साधून विज जोडणी देण्यास विनंती केली असता, विज बिलाची थकबाकी असल्याने सदर घराला विज जोडणी देण्यास विज खात्याने नाकार दिला व अगोदर सर्व पैसे भरा नंतरच विज जोडणी देण्यात येईल असे सांगितले अशी माहिती शाह यांनी दिली.

विज खात्याची चालाखी ....

त्या प्रमाणे फिरोजा शाह कुटुंबांनी आर्थिक संकटात असताना सुद्धा गेल्या वर्षी सरकारने काढलेल्या ओटीएस योजनेचा लाभ घेऊन या वर्षी दोन हप्त्यांत ही रक्कम भरण्यात आली, त्यातील पहिला हप्ता दि. 5 जानेवारी रोजी 64328 तर दुसरा हप्ता दि 9 फेब्रुवारी रोजी रूपये 64328 असे मिळून 128656 रूपये विज खात्यात भरण्यात आले, पण बिल भरल्या नंतर त्यांना सांगितले की सदर घराच कनेक्शन कायम स्वरुपी तोडण्यात आले असल्याने जोडणी देण्यात मिळणार नाही, त्यासाठी नवीन प्रक्रिया करावी लागणार, त्यामुळे पैसे भरून सुद्धा शाह कुटुंबाला अंधारात दिवस काढावे लागत आहे.

पंचायती कडून ना हरकत दाखला मिळेना

त्यानुसार विज खात्याने सांगितल्या प्रमाणे शाह कुटुंबांनी पंचायती कडे रीतसर कागदपत्रे सादर करून विज जोडणी साठी ना हरकत दाखला मागितला पण पंचायतीच्या क्षेत्रात घर नोंदणी क्रमांक असताना सुद्धा तीन महिने झाले तरी अद्याप दाखला मिळाला नाही असे फिरोजा शाह हीने सांगितले.

Problems due to lack of electricity
Problems due to lack of electricityDainik Gomantak

उतऱ्यावर नाव नसल्याने आरोग्य केंद्रा तर्फे ना हरकत दाखला देण्यास नकार

पंचायती कडून वीज जोडणी साठी ना हरकत दाखला दिला जात नसल्याने शाह कुटुंबांनी वाळपई आरोग्य केंद्राकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार ना हरकत दाखला देण्याची मागणी केली होती, पण जमीनीच्या उतऱ्यावर नाव नसल्याने ती मागणी फेटाळण्यात आली असल्याचे तीने सांगितले.

विज नसल्याने घराची दुरुस्ती रखडली

सद्या ज्या घरात शाह कुटुंब राहत आहे, ते घर पुर्ण पणे मोडकळीस आले असून, छप्परासाठी वापरण्यात आलेले लाकडी साहित्य ठिक ठिकाणी मोडलेले आहे, त्यामुळे शाह कुटुंबाला असुरक्षितता निर्माण झाली आहे, सद्या राहायला जागा नसल्याने आपल्या तीन मुलांना घेऊन डोक्यावर धोका घेऊन जीवन जगत आहे. त्यामुळे त्या घरातील एक परीवार भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे फिरोजा शाह हीने सांगितले.

Problems due to lack of electricity
Problems due to lack of electricityDainik Gomantak

मोबाईल रिचार्ज समस्येमुळे ऑनलाईन शिक्षणाला बांदा

फिरोजा शाह यांच्या तीन मुला पैकी एक मुलगी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर एक मुलगा इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे, पण घरात विज नसल्याने शेजारच्या घरात बसून शिकावे लागत आहे.

रात्रीच्या वेळी घरात घुसतात सरपटणारे प्राणी

घरात विज नसल्याने घराभोवती झाडेझुडपे वाढलेली असल्याने रात्री अपरात्री सरपटणारे प्राणी घरात घुसतात, त्यामुळे डोळ्यात तेल घालून मुलांच्या संरक्षणासाठी जागे राहावे लागते असे गहिवरून फिरोजा शाह हीने सांगितले.

चार वर्षांपासून अंगणवाडीचा कारभार सुद्धा काळोखातच

सदर घराची विज जोडणी तोडल्या नंतर या घराच्या एका खोलीत असलेल्या पोस्तवाड्यावरील अंगणवाडीचा कारभार सुद्धा काळोखातच सुरू आहे, सद्या कोव्हीड 19 प्रतिबंध नियमांमुळे मुले येत नसली तरी कर्मचारी वर्ग येऊन इतर कामे काळोखात बसून करीत आहे असे यावेळी फिरोजा शाह हीने सांगितले.

दरम्यान, या संबंधी फिरोजा शाह हीने दिलेल्या माहितीवरून या घराला विज जोडणी नसल्याने येथे राहणाऱ्या कुटुंबातील मुलांना ना धड शिक्षण, ना असुरक्षित राहण्यासाठी निवारा अशी अवस्था झाली आहे, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱी फिरोजा शाह ही असाह्य महीला विज जोडणी मिळावी यासाठी गेल्या चार महिन्यांपासून शासनाचे उभंरठे जिझवत आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास या भाजप सरकारच्या संकल्पनेला मात्र घटनेवरून बादा पोचली असे म्हणून सर्वत्र प्रकाशमय झालेल्या होंड्यात शाह कुटुंब जगते अंधारमय जीवन असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

या संबंधी होंडा पंचायतीचे पंच शिवदास माडकर यांनी सांगितले की विज ही मुलभूत सुविधां पैकी एक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अधोरेखित केले आहे, त्यामुळे सदर कुटुंबाला विज जोडणी देण्यास टाळाटाळ का होते, हेच कळत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com