गोव्यात खतपुरवठा सुरळीत

शेतकऱ्यांना खतांचे वाटप झाल्‍याची माहिती कृषी खात्‍याचे निरीक्षक सत्‍यवान देसाई यांनी दिली.
Farm
Farm Dainik Gomantak

पणजी : काही दिवसांपूर्वी खतांची टंचाई निर्माण झाल्‍याने शेतकरी चिंतेत होते. सरकारने तातडीने यावर उपाययोजना करून राज्‍यात खतांचा साठा उपलब्‍ध करून दिल्याने शेतकऱ्यांना खतांचे वाटप झाल्‍याची माहिती कृषी खात्‍याचे निरीक्षक सत्‍यवान देसाई यांनी दिली.

Farm
अपंगत्वामुळे मुलांनीच दूर लोटले !

कृषी खात्‍याने राज्‍यातील सुमारे 40 केंद्रावर 250 टन खत उपलब्‍ध करून दिले असून बि-बियाणांचेही वाटप सुरू असल्‍याचे देसाई यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी केवळ राज्‍यातच नव्‍हे तर देशात खतांची टंचाई निर्माण झाल्‍याची चर्चा होती. प्रत्‍यक्षात केंद्र सरकारकडे खतांचा पुरेसा साठा होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे खत निर्यातीवर परिणाम झाला असला तरी देशात खताच्‍या मागणीपेक्षा अधिक साठा आहे. राज्‍य सरकारच्‍या कृषी खात्‍याने राज्‍यातील सर्व वितरकांकडे तसेच कृषी खात्‍याच्‍या केंद्रांवर खताचा पुरवठा केला आहे. गेल्‍या आठवड्यापासून राज्‍यातील शेतकरी खत खरेदी करत असून सध्या परिस्‍थिती सुरळीत असल्‍याचे देसाई यांनी सांगितले.

Farm
मुख्यमंत्र्यांकडून उलटतपासणी! खरी कुजबुज

राज्‍यातील शेतकऱ्यांसाठी बी-बियाणांचा साठाही उपलब्‍ध असून शेतकरी याचाही लाभ घेत आहेत. राजधानी पणजीसह, मडगाव, फोंडा, सत्तरी, काणकोण आदी ठिकाणी शेतकऱ्यांना खते आणि बियाणांचे वितरण सुरू असल्‍याचे देसाई म्‍हणाले.

दरम्‍यान, केंद्रीयमंत्री कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांनी आढावा बैठक घेऊन आगामी पेरणीच्या हंगामापूर्वी देशात खतांचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले होते. देशात खतांची उपलब्धता अपेक्षित मागणीपेक्षा जास्त आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहनही त्‍यांनी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com