मयेत पंचायतींवर भाजपची सत्ता मात्र सरपंच पदासाठी रस्सीखेच कायम

मये वायंगिणीत सरपंच पदासाठी रस्सीखेच
Gram sabha
Gram sabha Dainik Gomantak

डिचोली: Maem Constituency तील पंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी काही पंचायतींत सरपंच पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. मतदारसंघातील अकरा प्रभागांची एक मोठी पंचायत असलेल्या मये-वायंगिणी पंचायतीत भाजप समर्थक गटाची सत्ता स्थापन करण्यासाठी स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पुढाकार घेतला असून, सरपंच आणि उपसरपंच पदासाठी नावेही निश्चित केली आहेत. ( fierce competition for the post of Sarpanch in Gram Panchayats of Maem Constituency)

Gram sabha
स्वावलंबन, स्वयंपूर्णता केवळ सहकारातून शक्य : मंत्री सुभाष शिरोडकर

शेट यांनी पुढाकार घेतला असून देखील सरपंच पदासाठी अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याने गुंता निर्माण झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. उद्या सोमवारी (ता.22) रोजी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामूळे पेच वाढणार की सुटणार याबाबत सर्वांनाच उत्सूकता आहे.

Gram sabha
''जमीन हडप प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून 'एसआयटी'तपासात हस्तक्षेप''

सरपंच पदासाठी रस्सीखेच

अकरा पंचसदस्यीय मये-वायंगिणी पंचायतीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या पंचायतीच्या भाजप समर्थक गटाच्या पंचसदस्यांबरोबर बैठका घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी अंतर्गत कराराचा तोडगा काढल्याची माहिती मिळाली आहे.

दावा केलेल्या पंचसदस्यांना सरपंचपद विभागून देण्याचे ठरविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठ पंचसदस्यांना सरपंचपद विभागून देण्याचा करार झाल्याचे समजते. या पंचायतीचे सरपंचपद खुले तर उपसरपंचपद महिलांसाठी राखीव आहे.

पहिला मान कोणाला ?

आमदारांनी ठरविल्याप्रमाणे प्रभाग-सहा मधून निवडून आलेले दिलीप शेट यांना सरपंचपदाची प्रथम संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला प्रथम संधी मिळावी, म्हणून सुवर्णा चोडणकर यांनीही आपले घोडे पुढे दामटले आहे. काही पंचांचा त्यांना पाठींबाही आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरपंचपदाची प्रथम संधी कोणाला मिळते, त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंचायतींवर बिनविरोध निवड

मये मतदारसंघातील मये-वायंगिणी, वन-म्हावळींगे, कारापूर-सर्वण, शिरगाव, पिळगाव, नार्वे आणि चोडण-माडेल या पंचायतींत भाजप गटाची सत्ता येणार आहे. या पंचायतींच्या सरपंच-उपसरपंचांची निवड बिनविरोध होणार असल्याचा दावा आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com