Football Cup: 17 वर्षांखालील महिला फुटबॉलचे गोव्यात ‘काऊंटडाऊन’ सुरु

17 वर्षांखालील महिला फुटबॉलचे गोव्यात ‘काऊंटडाऊन’
Football Cup
Football CupDainik Gomantak

पणजी: गोव्यात प्रत्येक गावात फुटबॉल मैदान आहे, पण त्याची जोपासना होत नाही, हे काम केवळ सरकारचेच नव्हे, तर सर्वांनी करणे आवश्यक आहे. यापुढे इच्छुक क्लबच्या मतीने राज्य सरकार या मैदानांची जोपासना करणार आहे. क्रीडांगणांची हेळसांड होऊ देणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली.

(FIFA U-17 Women's World Cup India hosts state is odisha maharashtra and goa )

भारतात होणाऱ्या फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘होस्ट सिटी’ लोगोचे अनावरण डोनापावला येथील राजभवन दरबार हॉलमध्ये झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. येत्या 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत देशात तीन ठिकाणी, ओडिशातील भुवनेश्वर, महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि गोव्यातील फातोर्डा येथे 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने खेळले जातील.

Football Cup
ICC ची मोठी घोषणा, या दोन मैदानांना 2023 अन् 2025 WTC फायनलचे मिळणार यजमानपद
Football Cup
Football CupDainik Gomantak

राज्यातील क्लबना आवाहन

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोव्यात प्रत्येक गावात फुटबॉल मैदान आहे. मैदानांच्या उद्‍घाटनानंतर वर्षभरात त्याची दैना होते, हिरवळही नामशेष होते. मैदानांची निगराणी राखणे केवळ सरकारचेच काम नव्हे, त्याच साऱ्यांची भागीदारी हवी. आम्ही वेगवेगळ्या क्लबना याकामी सहकार्याचे आवाहन करत आहोत. या क्लबनी पुढाकार घ्यावा. मैदान जोपासनेसाठी सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करेल.’’

Football Cup
IND vs AUS: सूर्यकुमार यादवसाठी आली ही मोठी बातमी, केला मोठा चमत्कार

‘जीएफए’ला सहकार्य करू

गोवा फुटबॉल संघटनेला (जीएफए) सरकारचर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील युवा फुटबॉलपटूंच्या दर्जा उंचावण्यासाठी जीएफएने पुढाकार घ्यावा, स्थानिक फुटबॉलपटूंना प्राधान्य द्यावे, अशी सूचना केली.

गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या (जीएफडीसी) सरकार क्रीडा गुणवत्तेला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘‘गोव्यातील प्रत्येक मुलगा फुटबॉल खेळतो. या राज्याने देशाला मौल्यवान फुटबॉलपटू दिले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फुटबॉलला राज्य खेळ घोषित करून या खेळाला सरकारमान्यता मिळवून दिली,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

वालंका आलेमाव यांचा गौरव

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीत सदस्यपदी बिनविरोध निवडून आलेल्या गोव्याच्या वालंका आलेमाव यांचा मुख्यमंत्र्यांहस्ते गौरव करण्यात आला. महासंघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात कार्यकारिणीवर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चिल आलेमाव यांचा चर्चिल ब्रदर्स, धेंपो स्पोर्टस क्लब, साळगावकर एफसी, सेझा फुटबॉल अकादमी, तसेच अन्य क्लबनी फुटबॉलसाठी दिलेल्या अलौकिक योगदानाचा खास उल्लेख केला.यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, राज्याचे मुख्यसचिव पुनीतकुमार गोएल, क्रीडा सचिव अजित रॉय, क्रीडा संचालक अजय गावडे, विश्वकरंडक स्थानिक आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com