Canals in Canacona: काणकोणला पन्नास बंधाऱ्यांचे वरदान !

भूजल पातळीत दिलासादायक वाढ - एप्रिल,मे महिन्यांत आटणाऱ्या विहिरींतही लाभतो पाणीसाठा
Canal |Canacona
Canal |CanaconaDainik Gomantak

Cannals in Canacona: जल जीवन आहे. आजही काणकोण तालुक्यातील काही भागात भूजल पातळी उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात घटत आहे. त्या भागांना तळपण,गालजीबाग व‌ त्याच्या उपनद्यांवर दरवर्षी उभारण्यात येणारे पन्नास बंधारे वरदान ठरत आहेत.

एकमेव तळपण नदीवर तिच्या कुस्के- खोतीगावातील उगमापासून मुखापर्यंत वीस पेक्षा जास्त बंधारे आहेत.त्यापैकी खोतीगावात पणसुलेमळ, व अन्य बंधाऱ्यांमुळे खोतीगावातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे जलस्त्रोत खात्याचे काणकोण येथील कनिष्ठ अभियंता कल्पना गावकर यांनी सांगितले.

Canal |Canacona
Goa News: खोर्ली-उसपकर जंक्शनवर नाल्याचे काम सुरू

भूजल पातळी वाढविण्यासाठी या बंधाऱ्यात दर वर्षी पाणी अडविण्यात येत आहे.त्यामुळे बंधाऱ्याशेजारील विहिरीच्या जल पातळीत वाढ होत आहे.ज्या विहिरी पूर्वी उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यात आटत होत्या. त्या विहिरीत आता एप्रिल मे महिन्यात बऱ्यापैकी पाणी साठा असतो, असे गावकर यांनी सांगितले.

काही बंधारे खाऱ्या पाण्यापासून नदीच्या वरच्या पात्राचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात येतात त्यामध्ये गालजीबाग नदीवरील भटाबांध,माशे येथे गांड्याबांध, वाकडे नदीवरील एक व गालजीबाग खाडीवरील एक असे तीन बंधारे उभारण्यात येतात, त्या साठी खारे पाणी अडविण्यासाठी मातीचा वापर करण्यात येत आहे.

Canal |Canacona
Goa Tourism: विदेशी पर्यटक योगासनांत मग्न!

जलक्रीडा, मत्स्यपैदासीसाठी उपयुक्त !

काणकोणातील काही बंधाऱ्यांचा उपयोग स्थानिक युवक जलक्रीडेसाठी करत आहेत.मात्र, त्याला अधिकृतपणे मान्यता दिल्यास मोठ्या प्रमाणात अंतर्गत पर्यटनाला चालना मिळू शकते.त्याशिवाय हे सर्वच बंधारे अंतर्गत भागात असल्याने गोड्या पाण्यातील मस्त्य पैदास करण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग करणे शक्य आहे.

ओलिताखालील क्षेत्रात वाढ

काणकोण मधील बंधाऱ्यांमुळे काणकोणमधील ओलिताखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.या बंधाऱ्याची भूजल पातळी वाढीला मदत झाली आहे.मात्र, काही भागात या बंधाऱ्याच्या पाण्याच्या जलसिंचनाचा उपयोग करून भाजी, मिरची अशा प्रकारची हंगामी पिके शेतकरी घेतात.

गवडोंगरी,खोतीगाव पंचायत क्षेत्रात या बंधाऱ्याचा उपयोग प्रामुख्याने अशी हंगामी पिके घेण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com