टपाल विभागाकडून कोविडविरुद्ध विशेष तिकिटे

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गोवा टपाल विभागाकडून ९ नोव्हेंबर रोजी “कोविड विरोधात लढण्यासाठी, मानसिक आरोग्याचा सांभाळ” या विशेष टपाल तिकिटे आणि टपाल पाकिटांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पणजी: गोवा टपाल विभागाकडून ९ नोव्हेंबर रोजी “कोविड विरोधात लढण्यासाठी, मानसिक आरोग्याचा सांभाळ” या विशेष टपाल तिकिटे आणि टपाल पाकिटांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या विशेष तिकिटे आणि टपाल पाकिटांचे पुरस्कर्ते गोवा फिलाटेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटी आहे.

गोवा टपाल विभागाकडून ९ नोव्हेंबर रोजी “कोविड - १९ विरोधात लढण्यासाठी संपर्क करा” या आशयाचे तिकिटांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ही विशेष तिकिटे पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्यालयात प्रदर्शन रूपात ठेवण्यात येणार आहेत. पणजी कार्यालयात ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर आणि मडगाव कार्यालयात १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान पाहण्यासाठी ही तिकिटे उपलब्ध असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खात्याने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे.

संबंधित बातम्या