डिचोलीत पाण्यासाठी मारामारी; उद्यापर्यंत पाणी पुरवठा होणार सुरळीत

d 2.jpg
d 2.jpg

डिचोली: चार दिवसांनंतर डिचोली (Dicholi) तालुक्यात पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी (Water supply) मारामारी झाली आहे. काल रात्री ते आज (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत नळ कोरडे राहिल्याने भर पावसाळ्यात पाण्याअभावी डिचोली तालुक्यातील जनतेचे विशेष करून गृहिणींचे  हाल झाले आहेत. डिचोली तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या 33 केव्ही भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, भूमिगत वीजवाहिनीतील बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेताना आज रात्री उशिरा बिघाड दूर करण्यात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पंपिंग आदी प्रक्रियेमुळे उद्या (रविवारी) पहाटेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे समजते. तसे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. (Fights for water in Bicholim Water supply will be smooth till tomorrow)

चार दिवसांपूर्वी मागील मंगळवारीही पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. कालपासून पुन्हा पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली. काल सायंकाळी साधारण साडेसात वाजल्यापासून ते शनिवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत नळ कोरडे राहिले. भर पावसाळ्यात नळ कोरडे राहिल्याने विशेष करून महिलावर्गाचे हाल झाले. शनिवारी तर विशेष करून ग्रामीण भागातील गृहिणींना पाण्यासाठी विहिरींवर धाव घ्यावी लागली. एकाबाजूने अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे गृहिणींना पाण्यासाठी कसरत करावी लागली. जवळपास विहिरींची सोय नसलेल्या भागातील जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी सहन करावी लागली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com