Pilerne Fire: बर्जर पेंट कंपनीवर गुन्हा नोंदवून 100 कोटी रुपयांचा मोबदला घ्या...

रिव्होल्युशनरी गोवन पक्षाचे प्रमुख मनोज परब यांची मागणी
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

Pilerne Fire: पिळर्ण औद्यागिक वसाहतीत बर्जर पेंट कंपनीला लागलेल्या आगीमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. संपूर्ण बार्देश तालुक्यावर याचा परिणाम झाला असून सुमारे 2 लाख नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. सरकारने बर्जर पेंट कंपनीवर गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून 100 कोटी रुपयांचा मोबदला घेतला पाहिजे, अशी मागणी रिव्होलुश्‍नरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Manoj Parab
Pilerne Fire: पिळर्ण परिसरातील हवेची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी; काय म्हटलंय अहवालात घ्या जाणून...

रिव्होलुशनरी गोवन्सने आगीच्या प्रकरणातून काही खबरदारीच्या मागण्या करणारे निवेदन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या वेळी सोबत सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मनोज परब म्हणाले की, बर्जर कंपनीला भीष आग लागण्याचे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून याची न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. वायू गुणवत्ता तपासण्यासाठी समिती गठित करावी. कंपनीकडून मोबदला घेऊन प्रभावित नागरिकांच्या हितासाठी खर्च केले पाहिजे. पेंटची कंपनी धोकादायक असल्याने कंपनीचे आगचे ऑडिट झाले होते की नाही याची चौकशी होणे आवश्‍यक आहे. या सर्व प्रकारासाठी सरकार जबाबदार आहे.

Manoj Parab
Goa Taxi: पेडणेतील टॅक्सी चालकांकडून ब्लू कॅब फॉर्मची होळी

आगामी विधानसभा अधिवेशनात पिळर्ण औद्योगिक वसाहतीत लागलेल्या भीषण आगसंदर्भात लक्ष्यवेधी सूचना आणि शून्य प्रहरात हा मुद्दा मांडणार आहे. दोषींवर कारवाई होणार की नाही, हे बघावे लागणार आहे. आज राज्यात हफ्ते देऊन आपले बेकायदेशीर व्यवहार केले जात आहे. हे असेच सुरूच राहिल्यास भविष्यात आणखी मोठ्या घटना घडतील, असा इशारा आमदार विरेश बोरकर यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com