मिकी पाशेको व अन्य तिघांविरुध्द तक्रार दाखल

Prashant Shetye
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सोशयल मीडियावर एसजीपीडीएची एक हजार चौरस मीटर जमीन घाऊक मासळी मार्केट संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मुसा यांना विकली असल्याची तथ्यहीन पोस्ट टाकून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एसजीपीडीएचे अध्यक्ष तथा नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी माजी मंत्री मिकी पाशेको व अन्य तिघांविरुद्ध मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सासष्टी
सोशयल मीडियावर एसजीपीडीएची एक हजार चौरस मीटर जमीन इब्राहिम मुसा यांना विकली असल्याची पोस्ट शेर करण्यात आली असून ही पोस्ट मिकी पाशेको, एद्रियानो पिंटो, हेंको कुदिन्हो आणि डामासीयान यांनी व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तिविरुद्ध कारवाई करण्यासाठी भादंसंच्या ५०५ आणि आयटी कायद्याखाली गुन्हा नोंद करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या