Arambol: अखेर 'त्या' विदेशी पर्यटक विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल

आमदार जीत आरोलकर यांनी पोलिसांना दिल्या होत्या कारवाईच्या सूचना
Arambol
ArambolDainik Gomantak

हरमल किनारी भागात मोठ्या प्रमाणात सायंकाळी विदेशी पर्यटक वेगवेगळ्या माध्यमातून आपले साहित्य आणि वेगवेगळ्या सामानाचा बाजार भरून अतिक्रमण करत असतात. केवळ पर्यटक म्हणून पर्यटकांनी अवश्य किनारी भागात यावे. परंतु पर्यटनाच्या नावावर पर्यटकांनी व्यवसाय करू नये असे आमदार जीत आरोलकर यांनी सुनावले होते.

त्यानंतर आज हरमल समुद्रकिनारी बेकायदेशीररीत्या साहित्य विकणाऱ्या ५ विदेशी पर्यटक विक्रेत्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन रशियन, एक नायजेरियन या विदेशीं नागरिकांसह तामिळनाडूतील एका व्यक्तीचा समावेश आहे.

Arambol
Winter In Goa: गोव्यात कडाक्याच्या थंडीने हुडहुडी

हरमल किनारी भागात मोठ्या प्रमाणात सायंकाळी ५ ते ७.३० पर्यंत विदेशी पर्यटक आपले मार्केट भरून व्यवसाय करत असतात. आज जर पर्यटकच व्यावसायिक बनले तर स्थानिकांनी काय करावे असा सवाल उपस्थित होत होता.

Arambol
Watch Video: गोवेकर & पर्यटक दोघांत हाणामारी, पणजीत भर रस्त्यात झाला राडा

याची दाखल घेऊन आमदार जीत आरोलकर यांनी हरमल किनारी भागात भेट देऊन विदेशींच्या मार्केट भरलेल्या ठिकाणी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीसांनी देखील लगोलग कारवाई करत विदेशींचे मार्केट उधळून लावले होते. अखेर आज त्या सर्व विदेशी पर्यटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com