अखेर वागातोरवासीयांचा पाणीपुरवठा दिलायरा लोबो यांच्या प्रयत्नाने सुरळीत!

गेले कित्येक महिने वागातोर भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिक लोकांना खासगी टॅंकरच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत असे.
अखेर वागातोरवासीयांचा पाणीपुरवठा दिलायरा लोबो यांच्या प्रयत्नाने सुरळीत!
Water supplyDainik Gomantak

वागातोर (Vagator) येथील लोकांना पिण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. बुधवारी दिवसभर स्थानिकांनी प्रखर आंदोलन छेडल्यानंतर पर्राच्या सरपंच दिलायला लोबो (Dilaira Lobo) यांनी तात्काळ दखल घेत गुरुवारी संबंधित यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लावत अखेर येथील पाणीपुरवठा (Water supply) रात्री उशिरापर्यंत सुरळीत केल्याची माहिती पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी दिली.

गेले कित्येक महिने या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिक लोकांना खासगी टॅंकरच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत असे. यासाठी भरपूर रक्कम मोजावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला होता. या संतापाचा उद्रेक बुधवारच्या रास्ता रोको आंदोलनात दिसून आला होता.

Water supply
सप्तकोटीश्वराचे दर्शन हा भाग्याचा क्षण: तेजस्वी सूर्या

हणजूण-कायसूव पंचायतीचे पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर तसेच शितल गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या ग्रामस्थांनी दिवसभर याभागातील किनारा रस्ता अडवून आंदोलन छेडले होते. येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या जमिनीखालील पाण्याच्या टाकीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने डोंगरमाथ्यावरील जलकुंभाकडे पाणी ओढले जात नव्हते.

या गोष्टीचा उलगडा झाल्याने दिलायला लोबो यांनी गुरुवारी सकाळी पणजीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची स्थानिक पंच सदस्यांसमवेत भेट घेत संबंधित खात्याच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लावले होते. शेवटी संध्याकाळी उशिरापर्यत जलकुंभातील तांत्रिक अडचण दूर करण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याचे पंच सदस्य सुरेद्र गोवेकर यांनी सांगितले.

ग्रामस्थांत समाधान

पर्राच्या सरपंच दिलायला लोबो यांनी या भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी फरफट आणि समस्या लक्षात घेऊन तात्काळ धाव घेत येथील तांत्रिक अडचणी दूर करीत महिलांना न्याय मिळवून दिल्याबद्दल या भागातील पंच सदस्या शितल नाईक तसेच महिला वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com